एक्स्प्लोर

मार्च महिन्यातच पूर्ण करा 'ही' 5 महत्वाची कामे, अंतिम तारीख किती?

मार्च महिना सुरू झाला आहे. त्यामुळं लवकरच 2023-24 आर्थिक वर्ष संपणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अशी अनेक कामे आहेत, की ज्यांची मुदत संपणार आहे.

Financial Deadlines: मार्च महिना सुरू झाला आहे. त्यामुळं लवकरच 2023-24 आर्थिक वर्ष संपणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अशी अनेक कामे आहेत, की ज्यांची मुदत संपणार आहे. यामध्ये मोफत आधार कार्ड अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीपासून ते कर सवलतीसाठी गुंतवणूक करणे, विशेष एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणे इत्यादी अनेक कामांचा समावेश आहे. जाणून घेऊयात 31 मार्चपूर्वी नेमकी काय काय कामे करावी लागणार आहेत. 

1)  मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत

जर तुम्ही बऱ्याच काळापासून आधार अपडेट केले नसेल, तर तुमच्याकडे आधार अपडेट करण्याची शेवटची संधी आहे. UIDAI ने त्याची अंतिम मुदत 14 मार्च निश्चित केली आहे. तुम्ही तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी मोफत अपडेट करू शकता.

2) SBI ची विशेष FD योजना

SBI ने आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवसांची विशेष FD योजना अमृत कलश लाँच केली आहे. ही योजना 12 एप्रिल 2023 रोजी सुरु करण्यात आली होती, ज्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. या विशेष एफडीची अंतिम मुदत 31 मार्च 2024 रोजी संपत आहे.

3) SBI गृहकर्ज दर

SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष गृहकर्ज मोहीम आणली आहे, ज्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना गृहकर्जावर 65 ते 75 बेसिस पॉइंट्सची सूट मिळत आहे.

4) IDBI बँकेची विशेष FD योजना

IDBI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष FD योजना देखील आणली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. या विशेष योजनेअंतर्गत सर्वसामान्य ग्राहकांना 7.05 टक्के ते 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देण्यात येत आहेत. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2024 रोजी संपत आहे.

5) कर सवलतीसाठी गुंतवणुकीची अंतिम मुदत

जर तुम्हाला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कर सवलतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर शेवटची संधी 31 मार्च 2024 आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत PPF, SSY सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला या आर्थिक वर्षात आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सूट मिळू शकते. त्यामुळं 31 मार्च 2024 पूर्वी ही सर्व कामे उरकावीत.

महत्वाच्या बातम्या:

8 व्या वर्षीच उद्योजक, 10 व्या वर्षी स्वत:ची वेबसाइट तर 18 व्या वर्षी 6 कोटींच्या कंपनीचा मालक

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केद्र सरकारला फटकार
Sangola Drought : सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Embed widget