एक्स्प्लोर

LPG Cylinder Price: दसऱ्यापूर्वी महागाईचा भडका; निळा एलपीजी सिलेंडर महागला; जाणून घ्या नवे दर

LPG Price Hike : दसऱ्याच्या आधी महागाईने थैमान घातले आहे. सणासुदीच्या काळात, एलपीजी (द्रवीकृत पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. हे नवे दर आजपासून १ ऑक्टोबरपासून लागू होतील.

LPG Price Hike :  दसऱ्याच्या आधी महागाईने थैमान घातले आहे. ऐन सणासुदीच्या काळात, १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG Price Hike) किमतीत १६ रुपयांची वाढ केली आहे, जी आजपासून लागू झाली आहे. दिल्लीत १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १,५९५.५० रुपये असेल, जी पूर्वी १,५८० रुपये होती. सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. देशभरातील बहुतेक शहरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ₹८५० ते ₹९६० दरम्यान आहे. सध्या, घरगुती एलपीजी सिलिंडर (LPG Price Hike) दिल्लीमध्ये ८५३ रुपयांना, मुंबईत ८५२.५० रुपयांना, लखनौमध्ये ८९०.५० रुपयांना, अहमदाबादमध्ये ८६० रुपयांना, हैदराबादमध्ये ९०५ रुपयांना, वाराणसीमध्ये ९१६.५० रुपयांना आणि पटनामध्ये ९५१ रुपयांना उपलब्ध आहे.(LPG Price Hike) 

LPG Price Hike: १९ किलोच्या सिलिंडरचे नवीन दर

तेल विपणन कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर, दिल्लीत १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत आता १,५९५.५० रुपये झाली आहे, जी पूर्वी १,५८० रुपये होती. कोलकातामध्ये, हे सिलिंडर आता १,७०० रुपये किमतीत उपलब्ध होईल, जे पूर्वी १,६८४ रुपये होते. मुंबईत ते १,५४७ मध्ये उपलब्ध असेल. पूर्वी त्याची किंमत १,५३१.५० होती. चेन्नईमध्ये आता सिलिंडरची किंमत १,७५४ आहे, जी सप्टेंबरमध्ये ₹१,७३८ होती. दरामध्ये १६ रूपयांनी वाढ झाली आहे.

LPG Gas: घरगुती सिलिंडरच्या किंमती जैसे थे

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. मात्र व्यावसायिक सिलिंडरसह विमान इंधन म्हणजे ATF च्या किमतीत बदल करण्यात आला आहे आणि दिल्लीत आता प्रति किलोलिटर 813.44 रुपये झाला आहे.

Rule Change 1st October: ऑक्टोबरपासून 'या' नियमांत बदल होणार!

रेल्वे तिकीट बुकिंग, डिजिटल पेमेंट, ऑनलाइन गेमिंग आणि राष्ट्रीय पेन्शन सिस्टमचा नियमांमध्ये येत्या 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ते नियम कोणते? एक एक करून जाऊन घेऊयात...

Rule Change 1st October: रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बदल

आतापर्यंत, एजंट आणि दलाल IRCTC तिकीट बुकिंगच्या पहिल्या काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक होते. यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते. पण आता १ ऑक्टोबरपासून, IRCTC वरून तिकीट बुक करताना सुरूवातीचे 15 मिनिटे आता एजंट तिकीट बुक करू शकणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळेल.

Rule Change 1st October: पेन्शन योजनेत बदल

नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) मध्ये एक नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू केले जाईल. यामुळे बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग कामगार एकाच पॅन नंबरचा वापर करून अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयी आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडता येईल.

Rule Change 1st October: डिजिटल पेमेंटमध्ये बदल

आता सर्वच जण UPI (Google Pay, PhonePe, Paytm) वापरून डिजिटल पेमेंट करतात. आता, NPCI ने एक मोठा बदल केला आहे. १ ऑक्टोबरपासून NPCI ने UPI चे "रिक्वेस्ट फॉर मनी" फीचर बंद करण्याचा निर्णय घेतलाय... या फीचरचा वापर कोणीही तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्यासाठी करू शकतो. याचा अनेकदा फसवणूक आणि फिशिंगसाठी गैरवापर केला जात असे. आता ते बंद झाल्यामुळे, डिजिटल व्यवहार आणखी सुरक्षित होतील. गुगल पे आणि फोनपे सारख्या अ‍ॅप्सद्वारे पैसे मागण्यासाठी ही सुविधा आता उपलब्ध राहणार नाही.

ऑनलाईन गेमिंगमध्ये बदल

ऑनलाइन गेमिंग क्षेत्र वेगाने वाढत आहे. परंतु त्यासोबत फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. सरकारने मंजूर केलेले नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. गेमिंग कंपन्यांवर सरकारकडून कडक नजर ठेवली जाईल. खेळाडूंना सुरक्षित वातावरण आणि पारदर्शक प्रणाली मिळेल. फसवणूक आणि बनावट अॅप्सवर बंदी घातली जाईल. यामुळे गेमिंग उद्योगाचे नियमन होईल आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.

महत्त्वाच्या बातम्या

NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Embed widget