Share Market: कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरला, Sensex 274 अंकानी वधारला
Stock Market Updates: सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये 1.6 टक्क्याची वाढ झाली तर पॉवर आणि रिअऍलिटी इंडेक्समध्ये एका टक्क्याची घट झाली.
मुंबई: सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार (Closing Bell Share Market Updates) सावरल्याचं दिसून आलं. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 274 अंकांची वाढ झाली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 84 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.45 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,418 अंकांवर पोहोचला, तर निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,244 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकमध्येही आज 110 अंकांची वाढ होऊन तो 42,457 अंकांवर बंद झाला.
आज बाजार बंद होताना (Closing Bell Share Market Updates) 1587 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1772 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 140 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना IndusInd Bank, NTPC, JSW Steel, HDFC Life आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर BPCL, Nestle India, Bharti Airtel, Power Grid Corporation आणि Kotak Mahindra Bank कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये आज 1.6 टक्क्यांची वाढ झाली, तर पॉवर आणि रिअॅलिटी इंडेक्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली. बीएसई मिडकॅपमध्ये 0.5 टक्क्यांची वाढ झाली तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये काहीशी घसरण झाली.
शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 94 अंकांच्या तेजीसह 61,234 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 अंकांच्या तेजीसह 18,180 अंकांवर खुला झाला. आज, पेटीएम कंपनीच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली.
रुपया 17 पैशांनी वधारला
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 17 पैशांनी वधारली. सोमवारी रुपयाची किंमत ही 81.84 इतकी होती, आज त्यामध्ये वाढ होऊन ती 81.67 इतकी झाली आहे.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- IndusInd Bank- 2.67 टक्के
- JSW Steel- 1.68 टक्के
- NTPC- 1.61 टक्के
- HDFC Life- 1.43 टक्के
- UltraTechCement- 1.31 टक्के
या शेअर्समध्ये घसरण झाली
- BPCL- 1.11 टक्के
- Nestle- 0.75 टक्के
- Power Grid Corp- 0.57 टक्के
- Bharti Airtel- 0.42 टक्के
- Kotak Mahindra- 0.22 टक्के