Share Market : मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार सावरला, Sensex मध्ये 20 अंकांची वाढ
Stock Market Updates : सार्वजनिक बँका आणि उर्जा क्षेत्रामध्ये दोन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर रिअॅलिटी क्षेत्रामध्ये 1.7 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वधारत असलेल्या शेअर बाजाराला आज काहीसा लगाम लागला असून आज शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. बाजाराची सुरुवात काहीशा घसरणीने झाली तर नंतर पुन्हा अंशता वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 20 अंकांची वाढ झाली असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही केवळ 5.50 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.04 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,136 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,345 अंकावर स्थिरावला.
आज शेअर बाजार बंद होताना 1829 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1460 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 122 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. IndusInd Bank, Asian Paints, NTPC, Maruti Suzuki आणि Power Grid Corp या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर UPL, Hero MotoCorp, SBI Life Insurance, Britannia Industries आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.
सार्वजनिक बँका आणि उर्जा क्षेत्रामध्ये दोन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर रिअॅलिटी क्षेत्रामध्ये 1.7 टक्क्यांची घसरण झाली आहे. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये काहीशी वाढ झाली.
शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये 66.40 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स निर्देशांक 58,049 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 29.90 अंकांच्या घसरणीसह 17,310.15 अंकांवर खुला झाला. त्यानंतर नफावसुलीमुळे विक्रीचा दबाव वाढू लागल्याने सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात आणखी घसरण झाली. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 16.16 अंकांच्या घसरणीसह 58,099.34 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 21 अंकांच्या घसरणीसह 17,319.05 अंकावर व्यवहार करत होता.
डॉलरच्या तुनलेत आज रुपयाच्या किमतीमध्ये काहीशी वाढ झाली असून आज रुपयाची किंमत 78.71 इतकी आहे.
आज आशियाई शेअर बाजारात घसरण झाली. हँगसँग, निक्केई, कोस्पी, तैवान आदी शेअर बाजारात घसरण सुरू आहे. अमेरिका आणि चीनमधील तणाव, महागाई आणि मंदीच्या शक्यतेने ही घसरण झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.























