Share Market: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम अजूनही भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे. सकाळी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्यानंतर बाजार बंद होताना तो पुन्हा काहीसा सावरल्याचं दिसून आलं. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 388 अंकांनी तर निफ्टीही 129 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 0.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 56,247.28 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.78 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,787.65 वर पोहोचला आहे.
मेटलच्या शेअर्समध्ये तब्बल पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ऑईल अॅन्ड गॅसमध्ये 2 टक्के तसेच उर्जा क्षेत्राच्या शेअर्समध्ये 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आज 2071 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1290 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 142 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो आणि बँक क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.8 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सोमवारी शेअर बाजारात Hindalco Industries, Tata Steel, Power Grid Corporation, JSW Steel आणि BPCL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर HDFC Life, Dr Reddy's Labs, M&M, Axis Bank तर HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Hindalco- 7.46 टक्के
- Tata Steel- 6.58 टक्के
- Power Grid Corp- 6.01 टक्के
- JSW Steel- 4.82 टक्के
- BPCL- 4.00 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- HDFC Life- 2.91 टक्के
- Dr Reddys Labs- 2.71 टक्के
- M&M- 2.07 टक्के
- Axis Bank- 2.06 टक्के
- HDFC Bank- 2.05 टक्के
संबंधित बातम्या: