Petrol Price Cross 200 Rs per liter : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी दरवाढ होत आहे. त्याचा परिणाम जगातील अनेक देशांमध्ये दिसू लागला आहे. विकसनशील नव्हे तर श्रीमंत देशांनाही याचा फटका बसू लागला आहे. भारतीय इंधन कंपनी इंडियन ऑइलची उपकंपनी असलेल्या कंपनीने श्रीलंकेत शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत 20 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल्या किंमतीत 15 रुपये प्रतिलिटर दरवाढ केली आहे. 


20 रुपयांनी पेट्रोल महाग


श्रीलंकेत असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची उपकंपनी श्रीलंका इंडियन ऑइल कंपनीने (LIOC) इंधन दरवाढीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या दरवाढीचे कारण दिले आहे. कंपनीने शनिवारी श्रीलंकन नागरिकांना दरवाढीचा मोठा झटका दिला.  पेट्रोलच्या दरात 20 रुपये आणि डिझेलच्या दरात 15 रुपयांनी वाढ केली.


पेट्रोलच्या दराने गाठले द्विशतक!


श्रीलंका इंडियन ऑइल कंपनीने या महिन्यात दुसऱ्यांदा इंधन दरवाढ केली आहे. श्रीलंकेत पेट्रोलचे दर 204 रुपये असून डिझेलचा दर 139 रुपये प्रतिलिटर आहे. 


श्रीलंकेत महागाईचा आगडोंब


श्रीलंकेत मागील काही महिन्यांपासून महागाईचा आगडोंब उसळला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच आता इंधन दरवाढीमुळे श्रीलंकन नागरिकांना महागाईचे चटके आणखीच वाढणार आहे. 


पाकिस्तानातही दरवाढ


पाकिस्ताननेही नुकतीच इंधर दरवाढ केली होती. पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात 12 रुपये प्रतिलिटरने वाढ करण्यात आली. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 159.86 प्रतिलिटर इतका आहे. 


भारताचं काय?


भारतात मागील 115 दिवसांपासून इंधन दर स्थिर आहेत. सध्या पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे दरवाढ टाळली जात असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकांमधील मतदानाचा शेवटचा टप्पा 7 मार्च रोजी आहे. त्यानंतर भारतात इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे. भारतात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही प्रमुख सरकारी इंधन कंपनी आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: