Gold Silver Price Today : रशिया-युक्रेन संकटाशी संबंधित नवीन घडामोडींमुळे सोमवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर 1.5 टक्क्यांनी वाढून 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याच्या दरात 800 रूपयांनी जोरदार वाढ झाली आहे. चांदीचा दर 1.5 टक्क्यांनी वाढून म्हणजेच 1,000 रूपयांनी वाढून चांदीचा दर 65,869 रुपये प्रति किलो झाला आहे. 


रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक बाजारालाही धक्का 


युक्रेनवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर सातत्याने नवनवीन निर्बंध लादत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव 1 टक्क्यांनी वाढून $1,909.89 प्रति औंस झाला आहे. चांदीचा दरही 1 टक्‍क्‍यांनी वाढून प्रति औंस 26 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे.


काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं ?


मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत फेब्रुवारीमध्येच 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच्या किंमती एका वर्षाच्या उच्चांकावर दिसत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणाव असाच सुरु राहिला तर सोन्या-चांदीच्या किंमती वाढतच जातील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मार्च अखेरीस सोने 55 हजारांचा टप्पा गाठू शकेल, तर 2022 मध्ये 60 हजारांचा टप्पा ओलांडेल, असाही अंदाज आहे. जगभरातील वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha