7th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने केंद्रीय (Central Government) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्के वाढ केली आहे. मात्र या वाढीव डीएचा लाभ कोणता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा.


पगारात होणार मोठी वाढ 


महागाई भत्ता वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला तुमच्या खात्यात वाढीव पगार मिळू शकतो. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र या वाढीचा फायदा फक्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSEs) मधील कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे.


किती झाला डीए? 


केंद्रीय सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली. यापूर्वी कर्मचाऱ्यांना सुमारे 170 टक्के डीए मिळत होता, त्यात आता 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. आतापासून कर्मचाऱ्यांना 184 टक्के डीए मिळेल.


18 महिन्यांच्या डीए थकबाकीवर काय आहे अपडेट?


गेल्या 18 महिन्यांपासून लटकलेल्या डीए थकबाकीबाबत बोलायचे झाले तर, सध्या तरी थकबाकी देण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. मात्र मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची कर्मचाऱ्यांची थकबाकी सरकारने दिलेली नाही. ज्यांची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. जेसीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच जेसीएमची डीओपीटी आणि वित्त मंत्रालय, खर्च विभागाच्या (Expenditure Department of India) अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक होणार आहे. ज्या यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.


महत्वाच्या बातम्या :