एक्स्प्लोर

Share Market : सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात तेजी, Nifty 16,600 वर तर Sensex 284 अंकांनी वधारला

Stock Market Updates : फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रांमधील शेअर्स वधारले असून सार्वजनिक बँका, ऑईल अॅन्ड गॅस,कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली.

मुंबई: सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात वाढ झाली असून आजही गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल असल्याचं दिसून आला. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 284 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 84 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.51 टक्के वाढ होऊन तो 55,681 वर स्थिरावला तर निफ्टीमध्येही 0.51 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,605 वर पोहोचला. आज 1950 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1302 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 155 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आज शेअर बाजार बदं होताना IndusInd Bank, Bajaj Finance, Tata Consumer Products, UPL आणि Bajaj Finserv या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर  Dr Reddy's Laboratories, Kotak Mahindra Bank, SBI Life Insurance, Cipla आणि Tech Mahindra कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 

फार्मा क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रांमधील शेअर्स वधारले असून सार्वजनिक बँका, ऑईल अॅन्ड गॅस,कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.2 टकक्यांची वाढ झाली आहे, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.9 टक्क्यांची वाढ झाली. 

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आज काहीशी वधारली असून रुपयाची किंमत आज 79.95 इतकी आहे. 

सत्राची सुरुवात काहीशा अस्थिरतेने
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांक 5.60 अंकांनी घसरत 55,391.93 अंकांवर खुला झाला. तर. निफ्टी निर्देशांक 2.70 अंकांनी वधारत 16,523.55 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 6.84 अंकांच्या घसरणी 55,390.69 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 7.65 अंकांनी वधारत 16,528.50 अंकांवर व्यवहार करत होता. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

IndusInd Bank- 7.82 टक्के
Bajaj Finance- 3.17 टक्के
TATA Cons. Prod- 2.93 टक्के
UPL- 2.73 टक्के
Bajaj Finserv- 2.38 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

Dr Reddys Labs- 1.97 टक्के
Kotak Mahindra- 1.49 टक्के
SBI Life Insura- 1.48 टक्के
Cipla- 1.32 टक्के
Tech Mahindra- 1.22 टक्के

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget