मुंबई: आज संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. दलाल मार्केटमध्ये चांगलीच तेजी आल्याचं दिसून आलं. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 848.40 अंकांनी वधारला तर निफ्टीही 237 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,862.57 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.37 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,576 वर पोहोचला आहे.
आज 1683 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1583 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 98 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना बँक, कॅपिटल गुड्स, एफएमजीसी, फार्मा, आयटी, रिअॅलिटी आणि मेटल या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर ऑटो, ऑइल अॅन्ड गॅस सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Tata Steel, Sun Pharma, IndusInd Bank, Shree Cements आणि Hindalco Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून BPCL, IOC, Tata Motors, M&M आणि SBI Life Insurance या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Tata Steel- 7.54 टक्के
- Sun Pharma- 6.86 टक्के
- IndusInd Bank- 5.76 टक्के
- Shree Cements- 5.04 टक्के
- Hindalco- 4.49 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- BPCL- 4.58 टक्के
- IOC- 2.76 टक्के
- Tata Motors- 2.60 टक्के
- M&M - 1.82 टक्के
- SBI Life Insurance- 1.48 टक्के
सकाळी सेन्सेक्स वधारला
संसदेत आज निर्मला सीतारमण यांनी बजेट सादरीकरणाला सुरुवात करताच त्याचा प्रभाव शेअर मार्केटवर झाल्याच दिसून आला. बजेटला सुरुवात होताच काहीच वेळात सेन्सेक्स 865 अंकांनी उसळला आणि तो 58,848.36 वर पोहोचला. ही वाढ एकूण 1.44 टक्क्यांची होती. तर बजेट सुरु होताच निफ्टीमध्ये 212 अंकांची वाढ होऊन तो 17,552.75 वर पोहोचला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- Budget 2022 Speech, Maharashtra: अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांपेक्षा कमी की जास्त?
- Budget 2022 PM Modi Reaction : अर्थसंकल्पातून तरुणांच्या अपेक्षा पूर्ण होणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- Budget 2022: कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, शेगावची कचोरी अन् सावंतवाडीची खेळणी; One Product One Station योजनेत आणखी कशाचं होणार प्रमोशन?