एक्स्प्लोर

चितळे बंधूंची बाकरवडी आता 'मिनी' स्वरूपात

चितळे बंधू आपली जगप्रसिद्ध बाकरवडी आता नव्या ‘मिनी’ स्वरूपात घेऊन आले असून ग्राहकांनी देखील याला चांगला प्रतिसाद दिला आहे. बाकरवडीचे नवे रुप खवय्यांच्या पसंतीस उतरत आहे.

मुंबई :  आपल्या रुचकर आणि दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांच्या मनावर गेली 75 वर्षे अधिराज्य गाजविणारे चितळे बंधू आपली जगप्रसिद्ध बाकरवडी आता नव्या ‘मिनी’ स्वरूपात घेऊन आले आहेत. चितळेंच्या या खमंग बाकरवडीचे हे नवे 'मिनी' रूप खवय्यांच्या विशेष पसंतीस देखील उतरत आहे.

सध्या देशभरात आयपीएलचा उत्साह शिगेला पोहोचत असताना या क्रिकेट फिव्हरचे औचित्य साधत चितळे बंधूंनी ही ‘मिनी’ बाकरवडी सादर केली आहे. मिनी बाकरवडीच्या प्रसिद्धीसाठी तीन नव्या जाहिरातीही प्रदर्शित करण्यात आल्या असून सुप्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ व आयुष मेहरा यांच्यावर चित्रित झालेल्या या जाहिरातींमध्येही क्रिकेट आणि आयपीएलवर विशेष भर देण्यात आला आहे. 'गेट मॅच रेडी विथ चितळे बाकरवडी' अर्थात 'आयपीएल क्रिकेट सामन्याची तयारी चितळे बाकरवडी सोबतच' असा संदेश या जाहिरातींमधून देण्यात आला आहे.

 मिनी बाकरवाडीच्या साथीने क्रिकेटप्रेमींचा आयपीएल सामन्यांचा थरार अधिक रोमांचक होईल असा विश्वास व्यक्त करीत चितळे बंधूं मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे म्हणाले, "आयपीएल दरम्यान क्रिकेट चाहते वेगवेगळ्या संघांमध्ये जरी विभागले गेले तरी खाद्यपदार्थ खऱ्या अर्थाने त्यांना एकत्र बांधून ठेवतात. आता चितळे बंधूंच्या या नव्या मिनी बाकरवडीसोबत आम्ही क्रिकेटरसिकांच्या रोजच्या क्रिकेट दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनणार आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”

आयपीएल ही भारतातील एक नावाजलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळेच आम्ही या क्रिकेट हंगामाच्या निमित्ताने मिनी बाकरवडी बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या भविष्यात या नव्या उत्पादनामुळे व जाहिरातींमुळे आम्ही भारताच्या नव्या बाजारपेठांमध्ये निश्चितच विस्तार करू, याची आम्हाला खात्री आहे असे चितळे बंधूंचे भागीदार केदार चितळे म्हणाले.

चितळे बंधू सध्या 75 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. मुंबई इंडियन्स संघासोबत ते ‘स्नॅकिंग पार्टनर’ म्हणूनही जोडले गेले आहेत. अशातच ही मिनी बाकरवडी क्रिकेट रसिकांना चितळेंसोबत जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे हे विशेष.

महत्त्वाच्या बातम्या

क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
Rajputana Biodiesel : राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलील नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलील नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
Embed widget