एक्स्प्लोर

होळीच्या चीनी वस्तूंवर भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार, चीनला 10 हजार कोटींचा फटका

यावर्षी कोरोनामुळे (Corona) बाजारपेठेत मंदी जरी असली तरी भारतीय व्यापाऱ्यांनी चीनच्या होळीच्या वस्तूंवर (Chinese Product) बहिष्कार टाकल्याचं दिसून आलंय.

नवी दिल्ली : होळीच्या दिवशी दरवर्षी उत्तर भारतातील  बाजारपेठा चीनी मालाने व्यापून गेलेल्या दिसून येतात. पण या वर्षी चित्र काहीसं वेगळं आहे. या वर्षी उत्तर भारतातील, खासकरुन दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी चीनच्या मालावर बहिष्कार टाकला असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे चीनला सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचं दिसून आलंय.

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन देशादरम्यान तणावाचं वातावरण आहे. त्याचा परिणाम या दोन देशादरम्यानच्या व्यापारावरही झाल्याचं दिसून आलंय. यावेळी आधीच कोरोनामुळे व्यापारी चिंतेत आहेत, त्यांना मोठ्या मंदीचा सामना करावा लागतोय. पण तरीही त्यांनी चीनच्या स्वस्त मालाची आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे हे विशेष.

देशातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या दिल्लीच्या सदर बाजारात यावेळी रंगांच्या दुकानांची संख्या कमी आहे. कोरोनामुळे या दुकानातील ग्राहकांची संख्याही कमी दिसत आहे. या दुकानातून चायनीज पिचकारी आणि रंग गायब झाल्याचं दिसून येतंय. 

गेल्या दहा महिन्यात चीनला 80 हजार कोटींचा फटका
होळीच्या काळात दरवर्षी चीनमधून 10 हजार कोटींचे सामान आयात करण्यात येते. त्यामध्ये रंग, अबिर, गुलाल, प्लॅस्टिकच्या पिचकारी आणि इतर साहित्यांचा समावेश होतो. पण या वर्षी व्यापारांच्या राष्ट्रीय संघाने चीनच्या साहित्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी व्यापारांच्या वतीने एक मोहीम चालवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या 10 जून 2020 पासून आतापर्यंत सुमारे 80 हजार कोटी रुपयांची आयात न झाल्याने चीनला फटका बसला आहे. याला कोरोनाचे कारणही तितकेच जबाबदार आहे. 

कोरोनामुळे 25 हजार कोटींचे नुकसान
व्यापारी संघाच्या एका अहवालानुसार, कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी देशातील व्यापाऱ्यांचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ दिल्लीतील व्यापाऱ्यांचे दोन हजार कोटींचे नुकसान  झाल्याचं दिसून आलंय. कोरोनामुळे आतापर्यंत देशातील जवळपास 40 हजार सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Share Market : एका वर्षात 87 टक्के रिटर्न, स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 7 टक्क्यांची तेजी, सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनीला 9 कोटींच्या कामाची ऑर्डर
एका वर्षात 87 टक्के रिटर्न, स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 7 टक्क्यांची तेजी, कंपनीला 9 कोटींच्या कामाची ऑर्डर
RBI : देशातील काही शहरांमध्ये ATM मध्ये नोटांची टंचाई, एटीएमममध्ये खडखडाट असल्याच्या तक्रारीवर आरबीआयची कठोर भूमिका, बँकांकडून डेटा मागवला
ATM मध्ये नोटांची टंचाई, आरबीआयची तक्रारी येताच कठोर भूमिका, बँकांकडून डेटा मागवला
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Embed widget