एक्स्प्लोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळणार, सरकार 3 टक्के महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता, पगार किती रुपये वाढणार?

DA Hike : सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेऊ शकतं. महागाई भत्ता वाढी संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकतं. आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवून देऊ शकतं. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तर पेन्शनधारकांना महागाईपासून बचाव करण्यासाठी रक्कम (Dearness Relief) दिली जाते. याचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारक मिळून 1.2 कोटी जणांना होतो. केंद्र सरकार दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढवू शकतं.सध्या महागाई भत्ता 55 टक्के आहे. त्यामध्ये 3 टक्के वाढ झाल्यास तो 58 टक्क्यांवर जाईल. हा महागाई भत्ता जुलै 2025 पासून लागू केला जाईल.

फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे. जो ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो.

सरकार एका वर्षात दोन वेळा महागाई भत्ता वाढवते. जानेवारी ते जून या कालावधीसाठी जानेवारीत तर जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो. गेल्यावर्षी केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भात घोषणा केली होती. गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर 2024 ला महागाई भत्ता वाढवण्यात आल्याची घोषणा झाली होती. यंदा दिवाळी 20-21 ऑक्टोबरला आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारावर महागाई भत्ता निश्चित केला जातो. हा फॉर्म्युला 12 महिन्यांच्या सरासरीच्या आकडेवारीवर आधारित असतो. जुलै 2024 ते जून 2025 दरम्यान सीपीआय-आयडब्ल्यू 143.6 होता. जो 58 टक्के महागाई भत्त्याच्या बरोबर आहे. याचा अर्थ जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 3 टक्के वाढवून देऊ शकतं.

पगार किती वाढणार?

जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 50000 रुपये असेल तर 55 टक्क्यांनुसार 27500 रुपये मिळेल. जर महागाई भत्ता 58 टक्के झाला तर महागाई भत्ता 29000 रुपये मिळेल. म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार 1500 रुपयांनी वाढेल. तर, 30000 पेन्शन मिळत असेल त्यांना 55 टक्क्यांनुसार डीआर 16500 रुपये मिळत असेल तर 58 टक्क्यांनुसार 17400 रुपये मिळेल.

सातव्या वेतन आयोगानुसार वाढणारा शेवटचा महागाई भत्ता असेल. कारण सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. सरकारनं जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Amit Shah in Pune: अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
Embed widget