SBI New FD rates 2023 : बँकेने काही कालावधीतील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ 25 ते 50 बेस पॉइंट्सने केली ​​आहे. याचा अर्थ आता तुम्हाला ठेवींवर अधिक फायदे मिळणार आहेत. हे नवीन व्याजदर 27 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू करण्यात आले आहेत.


SBI New FD rates 2023 : देशातील आघाडीची सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन वर्षापूर्वी बँकेकडून एक चांगली बातमी आली आहे. आता बँकेने काही कार्यकाळात ठेवींमध्ये 25 ते 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे, याचा अर्थ आता तुम्हाला ठेवींवर अधिक फायदे मिळणार आहेत. हे नवीन व्याजदर 27 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू करण्यात आले आहेत.


स्टेट बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. 1 वर्ष ते 2 वर्षे, 2 वर्षे ते 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीतील एफडी वगळता सर्व कार्यकाळांवर दर वाढले आहेत. सध्या उपलब्ध असलेला सर्वोच्च व्याजदर 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. मात्र, त्यात सुधारणा झालेली नाही. तो अजूनही केवळ 7 टक्के आहे. या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.50 टक्के व्याज मिळत आहे.


5 लाखांच्या FD वर  तुम्हाला किती परतावा मिळेल?


जर तुम्ही 5 लाख रुपयांची FD केली असेल आणि तुम्हाला आता किती परतावा मिळेल याबाबतची माहिती पाहुयात. 


1) 1 वर्षासाठी 5 लाख रुपयांच्या FD वर 6.80 टक्के व्याजदरानुसार तुमचे व्याज उत्पन्न 34,877 रुपये असेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 5,34,877 रुपये मिळतील.


2) 2 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या FD वर तुम्हाला 7 टक्के रिटर्नवर 74,441 रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 5,74,441 रुपये मिळतील.


3) आता बँकेने 3 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या FD वरचे व्याज 6.75 रुपये केले आहे, आता तुम्हाला फक्त व्याजातून 1,11,196 रुपये मिळतील. आणि तुम्हाला मॅच्युरिटीवर 6,11,196 रुपये मिळतील.


Fd म्हणजे काय?


Fd म्हणजे Fix Deposit. फिक्स म्हणजे निश्चित आणि डिपाँझिट म्हणजे जमा म्हणजेच एक अशी रक्कम जी एका निश्चित कालावधीसाठी ठाराविक आणि निश्चित व्याजदरावर आपण बँकेत जमा करत असतो. एफ डी मध्ये आपण एका निश्चित कालावधीसाठी बँकेत पैसे जमा करत असतो. ज्यावर आपल्याला एक फिक्स व्याज दर देखील प्राप्त होत असते.



(टीप: कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)


महत्त्वाच्या बातम्या:


FD तोडावी की कर्ज घ्यावं? अचानक पैशांची गरज भासली तर कोणता निर्णय फायदेशीर ठरेल?