पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील वाद आता टोकाला जातांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल करत टीका केली आहे. अजित दादा हे स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही, असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, यावेळी बोलतांना त्यांनी ही टीका केली आहे. 


अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्च्याची किल्ले शिवनेरीपासून सुरवात झाली आहे. या मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्यावर अजित दादांच्या आव्हानाचे कोणते ही दडपण नाही, असं मोर्चाचा शुभारंभ करताच स्पष्ट केले. चार दिवसांचा मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातून आणि बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे. याद्वारे अजित पवार त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेत, असा अप्रत्यक्ष टोला खासदार कोल्हे यांनी लगावला आहे. विशेष बारामतीमधून जाणाऱ्या याच मोर्च्यात अजित पवारांच्या बहिण म्हणजेच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी होणार आहेत. 


अमोल कोल्हेंना पाडणारच...


अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात थेट दंड थोपटले आहे. तर, एकेकाळी अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हानच दिले आहे. विशेष म्हणजे हे आव्हान दिल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळीच अजित दादा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. महत्त्वाचं म्हणजे, अजित पवारांना याबाबत विचारणाही झाली. पण त्यावेळी मात्र ते म्हणाले की, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही, हा दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे आगामी काळात अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे असा थेट वाद पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 


'बात निकली तो दूर तक जाएगी'


अजित पवार आणि अमोल कोल्हेंची खडाजंगी सुरु असतानाच कोल्हे यांच्याकडून अजित पवारांना थेट प्रत्युत्तर दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. "खासगीतील गोष्टी सार्वजनिक झाल्यास पार्श्वभूमी देखील बाहेर येईल, असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे. तसेच अजित पवारांनी मला आव्हान देणे माझ्यासाठी गौरव आहे. तसेच, बात निकली तो दूर तक जाएगी असा इशारा देखील कोल्हे यांनी दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Shirur Lok Sabha : मी अजित पवारांसोबत जातोय या चर्चांना अजून वेळ, आढळरावांच्या विधानाने शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक