Shikhar Dhawan : भारतीय संघाबाहेर असलेला सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळांमुळे सर्वाधित चर्तेत आहे. त्याला अलीकडेच पत्नी आयशापासून घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे. शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) यांचा घटस्फोट झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात असतानाही त्यावर बरीच चर्चा झाली. धवन आणि आयशा यांचा ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला. धवनचा मुलगा जोरावरचा मंगळवारी (26 डिसेंबर) वाढदिवस झाला. मात्र, मुलांचा ताबा पत्नीकडे असल्याने तो मुलग्याला भेटू शकत नाही. त्यामुळे धवनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त धवनने एक भावनिक पोस्ट केली आहे. त्याची काळीज चिरणारी पोस्ट पाहून कोणं म्हणतं बाप रडत नाही? अशी प्रतिक्रिया उमटली आहे. 






वर्षभरापासून धवन आपल्या मुलाला भेटला नाही


शिखर धवन गेले वर्षभर आपल्या मुलाला भेटू शकलेला नाही. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून जोरावरला पाहू शकलेला नाही. आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त धवनने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली. 'मी तुला शेवटचं पाहून एक वर्ष झालं आहे. मला आता जवळपास तीन महिन्यांपासून सर्वत्र ब्लॉक केलं गेलं आहे. म्हणून तुझ्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी, मला तोच जुना फोट पोस्ट करून सांगायचे आहे.


धवन आपल्या पोस्टमध्ये म्हणतो... 


माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जरी मी थेट कनेक्ट होऊ शकत नसलो तरी, मी नेहमीच तुमच्याशी टेलिपॅथीद्वारे (मनातून संवाद) जोडलेला असतो. मला तुझा खूप अभिमान आहे, आणि मला माहित आहे की तुझं खूप चांगलं चाललं आहे, मोठा होत आहेस. तुझे बाबा तुझी नेहमीच आठवण ठेवतात आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो नेहमी सकारात्मक राहतो आणि देवाच्या कृपेनं भेटीच्या दिवसाची वाट पाहतो. खोडकर हो, परंतु विचलित होऊ नकोस. इतरांना मदत कर, नम्र हो, दयाळू हो, धीर धरायला शिक आणि मजबूत रहा. तुला भेटण्यास सक्षम नसतानाही, मी जवळजवळ दररोज तुला मेसेज पाठवतो. मला तुझ्या चांगलं असण्याबद्दल आणि दैनंदिन जीवनाबद्दल जाणून घ्यायचं आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा काय घडत आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. तुम्हाला खूप खूप प्रेम.




धवनच्या पोस्टही नेटकरी भावूक 


शिखर धवनची काळीज चिरणारी पोस्ट पाहून चाहत्यांसह नेटकरी सुद्धा भावूक झाले. एका यूजरने लिहिलं की,  या ओळी वाचून माझे हृदय तुटले आहे. दुसर्‍याने लिहिलं की, आणि इथं सर्व पुरुष रडले. एकाने लिहिलं, कोण म्हणतं पुरुष रडत नाहीत? त्याला इथं आणा.


इतर महत्वाच्या बातम्या