Nirmala Sitharaman On 7 Priorities of Budget: देशाच्या सर्वांगिण विकासाठी यंदाच्या बजेटमध्ये सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये यंदाचं बजेट हे सात घटकांवर म्हणजे सप्तर्षीवर आधारित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अर्थसंल्पाचे सात प्राधान्यक्रम- सप्तर्षी
1.सर्वसमावेशक विकास
2. शेवटच्या घटकापर्यंत विकास
3. पायाभूत सुविधांचा विकास
4. क्षमतांमध्ये वाढ करणे
5. ग्रीन ग्रोथ
6. युवाशक्ती
7. आर्थिक क्षेत्र
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज अर्थसंकल्प मांडला. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा आज शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे. मोदी सरकारचा हा एकूण नववा अर्थसंकल्प आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीचा तसेच या वर्षात आठ ते दहा राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.
बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी काय?
- कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा
- हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे
- स्वयंपूर्ण स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी 2200 कोटी रुपयांची घोषणा
- कापसासाठी क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजनेची घोषणा
- पोषण, अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल
- कृषी स्टार्टअप्स निर्माणर सरकारचा भर. भारताला बाजरींचे जागतिक केंद्र बनविण्यावर भर.
- बचत गटांवर भर देऊन आर्थिक सक्षमीकरणावर सरकारचा भर असेल.
- सरकार कृषी क्षेत्रासाठी साठवण क्षमता- गोडाऊन वाढवणार आहे
- FY24 मध्ये कृषी कर्जाचे लक्ष्य 11.1% ने वाढून 20 लाख कोटी रुपये होईल
- पशुसंवर्धन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय क्षेत्राला कर्ज देण्यावर भर द्या
- खाजगी क्षेत्रातील R&D टीमसोबतही काम करेल
- बाजरीसाठी जागतिक स्तरावरील संशोधन संस्था बनवणार