नवी दिल्ली: मंगळवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या कमाईतून जानेवारी 2022 महिन्यात केंद्र सरकारला तब्बल 1.38 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्या आधी सप्टेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारला जीएसटीच्या करातून 1.30 लाख कोटी रुपये मिळाले होते. त्या तुलनेत या जानेवारीतील जीएसटी महसूल अधिक आहे. 


जानेवारी 2022 मध्ये मिळालेल्या जीएसटीमध्ये राज्य सरकारचा जीएसटी 32,016 कोटी रुपये, इंटिग्रेटेड जीएसटी म्हणजे आयजीएसटीमधून 72,030 कोटी रुपये, सेसमधून 9,674 कोटी रुपये यांचा समावेश आहे. 


केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 मध्ये जीएसटी महसूल हा जानेवारी 2021 महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15 टक्के आणि आणि जानेवारी 2020 मधील जीएसटी महसुलापेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे. 


 




गेल्या वर्षी, एप्रिल 2021 साली सरकारला सर्वाधिक म्हणजे 1.39 लाख कोटी रुपये मिळाले होते. जीएसटी महसूलाने आतापर्यंत चौथ्यांदा 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: