Budget Session 2024 नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम बजेट सादर केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प निर्मला सीतारमण 2024-2025 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यास मंजुरी दिली आहे. निर्मला सीतारमण 23 जुलै रोजी अर्थसकंल्प सादर करतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. देशात लोकसभा निवडणूक होणार असल्यानं अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. निर्मला सीतारमण यांच्यावर पुन्हा अर्थमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निर्मला सितारमण सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये विकसित भारत यावर लक्ष केंद्रीत जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं होतं की, केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या जीवनात सुधारणा होण्यासाठी समर्पित आहे. केंद्र सरकार यासाठी प्रयत्न सुरु ठेवेलं, असंही सीतारमण म्हणाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत एनडीएन विजय मिळवल्यानंतर नव्या सरकारमध्ये अर्थ खात्याची जबाबदारी निर्मला सीतारमण यांच्याकडे देण्यात आली आहे. आता निर्मला सीतारमण 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करतील.
लोकसभा निवडणुकीनंतर 24 जूनपासून संसदेचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं होतं. नव्या खासदारांना शपथ देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं होतं. आता निर्मला सीतारमण द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करतील.
दरम्यान, भाजपला लोकसभा निवडणुकीनंतर स्वबळावर सरकार स्थापन करता आलं नसलं तरी एनडीएला सरकार स्थापन करण्याइतकं संख्याबळ मिळाल्यानं केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं.
संबंधित बातम्या :