Arjun Khotkar on Ladaki Bahin Yojana : सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा होत असतानाच शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या भाषणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कार्यकर्त्यांना या योजनेवर मार्गदर्शन करताना खोतकर इतर पक्षाच्या लोकांच्या अगोदर आपण गावा गावात जाऊन यादी तयार करायचं नाटक करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत . त्यामुळे सरकारच्या योजनेचा फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी महायुतीतील पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये चढाओढ लागलीय का? असा सवाल उपस्थित होतोय.
लाडकी बहिण योजना काय आहे?
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून 'मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहीण योजना' ही सरकारी योजना राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 या वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेची घोषणा झाल्यापासून ग्रामीण भागांमध्ये सेतू केंद्र आणि ग्रामपंचायतींमध्ये अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे.
एका कुटुंबात दोन महिलांचा मिळणार लाभ
लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र, या योजनेची पहिली रक्कम अकाऊंटवर कधी जमा होणार याबाबतची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दरम्यान, 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवाय, एका कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कोण असणार पात्र?
* महाराष्ट्र रहिवासी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र कोण असेल?
* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
इतर महत्वाच्या बातम्या