Budget 2023 Live Updates: बजेटचं महाकव्हरेज; अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा; जुनी कररचना रद्द

Budget 2023 Live Updates: केंद्र सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज. मोदी सरकारच्या काळातील नववा अर्थसंकल्प. संपूर्ण देशाचे अर्थसंकल्पाकडे लक्ष...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Feb 2023 01:17 PM
Nirmala Sitharaman on Union Budget 2023 : काय स्वस्त? काय महाग?


Budget in Indian Parliament LIVEUnion Budget 2023: अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा; जुनी कररचना रद्द

Budget in Indian Parliament LIVEUnion Budget 2023: अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा; जुनी कररचना रद्द



  • जुनी कररचना रद्द

  • 0 ते 3 लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री

  • 3 ते 6 लाख उत्पन्नावर 5 टक्के कर

  • 6 ते 9 लाख उत्पन्नावर 10 टक्के कर

  • तर 9 ते 12 लाख उत्पन्नावर 15 टक्के कर

  • 12 ते 15 लाख उत्पन्नावर 25 टक्के कर 

  • 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांसाठी 30 टक्के कर 

Union Budget 2023 Live : अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा, 'या' गोष्टी होणार महाग

 Union Budget 2023 Live : अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा, 'या' गोष्टी होणार महाग 



  • विदेशी किचन चिमणी

  • सोन्याचे दागिने

  • चांदीचे दागिने

  • चांदीची भांडी

  • सिगरेट

Budget in Indian Parliament LIVEUnion Budget 2023: अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा; 'या' वस्तू होणार स्वस्त

Budget in Indian Parliament LIVEUnion Budget 2023: अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा; 'या' वस्तू होणार स्वस्त



  • मोबाईल

  • टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग

  • इलेक्ट्रिक वाहने

  • खेळणी

  • कॅमेरा लेन्स

Budget in Indian Parliament LIVE: 2030 पर्यंत 5 MMT ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचे लक्ष्य, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

  • लडाखमध्ये अक्षय ऊर्जेसाठी 20700 कोटी रुपयांची तरतूद

  • 2030 पर्यंत 5 MMT ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचे लक्ष्य

  • ऊर्जा संक्रमणासाठी 19700 कोटी रुपयांची तरतूद

  • ऊर्जा सुरक्षेसाठी 35000 कोटी रुपयांची तरतूद

  • ग्रीन क्रेडिट योजनेची अधिसूचना लवकरच येईल

  • बॅटरी ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी नियम आणेल

  • धोरण रद्द करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करेल

Budget 2023 LIVE: ई-कोर्टसाठी 7000 कोटी रुपये खर्च केले जातील, अर्थमंत्र्यांची घोषणा

  • ई-कोर्टसाठी 7000 कोटी रुपये खर्च केले जातील

  • विवाद से विश्वास योजना-2 मध्ये सेटलमेंटच्या नवीन अटी आणतील

Union Budget 2023 : मोदींचे 'सप्तर्षी' मिशन; देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच्या बजेटमधील सात प्राधान्यक्रम

Nirmala Sitharaman On 7 Priorities of Budget: देशाच्या सर्वांगिण विकासाठी यंदाच्या बजेटमध्ये सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार आहे. 


Union Budget 2023 Agriculture Sector: बांधावरच्या शेतकऱ्यांना हातांना डिजीटल बळ देणार, शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये झाल्या 'या' मोठ्या घोषणा

Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (finance minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प(budget 2023) सादर केला. यात त्यांनी शेतकऱ्यांशी(farmers) संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.  देशातील शेतकऱ्यांसाठी  डिजीटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा करण्यात आली आहे.  हा  निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे. 


Nirmala Sitharaman on Union Budget: दिल्लीत राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Nirmala Sitharaman on Union Budget: दुर्मीळ आणि चांगल्या पुस्तकांसाठी राजधानी दिल्लीत राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. तसंच राज्य सरकारांनी पंचायत स्तरावर तसेच वॉर्ड स्तरावर छोटी ग्रंथालये उभारावीत यासाठी प्रोत्सहन दिलं जाण्याचा प्रस्ताव आहे. तसंच राष्ट्रीय स्तरावर सुरु होणाऱ्या डिजिटल ग्रंथालयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सुविधा ग्रामपंचायत तसंच वॉर्ड स्तरावर सुरु करावेत यासाठीही योग्य ती मदत पुरवण्याचा केंद्राचा मानस आहे.

Union Budget LIVE : अर्थसंकल्पात तरुणांसाठी मोठ्या घोषणा

Union Budget LIVE : अर्थसंकल्पात तरुणांसाठी मोठ्या घोषणा



  • केंद्र सरकार प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 लाँच करणार आहे.

  • तरुणांना आंतरराष्ट्रीय संधींसाठी कुशल बनवण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स स्थापन करण्यात येणार आहेत.

Prime Minister Skill Development Scheme : Budget 2023 : पंतप्रधान कौशल्य विकास योजना 4.0 लाँच करणार : अर्थमंत्री

Prime Minister Skill Development Scheme : Budget 2023 : पारंपारिक कारागिरांसाठी सहाय्य पॅकेजची संकल्पना मांडण्यात आली आहे, ज्यामुळे ते एमएसएमई चेनशी एकरूप होऊन त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, प्रमाण आणि पोहोच सुधारण्यास सक्षम होतील


गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार जगातील दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. आम्ही अनेक शाश्वत विकासांच्या ध्येयांमध्ये मध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. अनेक योजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीमुळे सर्वसमावेशक विकास झाला आहे.

Agriculture Sector : Budget 2023 : शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास मदत केली जाणार : अर्थमंत्री

Agriculture Sector : शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास मदत केली जाईल. 10,000 जैव इनपुट संसाधन केंद्रे उघडली जातील.

Budget in Indian Parliament LIVEUnion Budget 2023 India Union Budget 2023: 5 जीसाठी विकासासाठी 100 लॅब्सची स्थापना केली जाणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

Budget in Indian Parliament LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा 



  • 50 अतिरिक्त विमानतळ, एरोड्रोम आणि हेरीपोर्टची देखील उभारणी केली जाणार 

  • अर्बन इन्फ्रा डेव्हलपमेंट फंडसाठी प्रति वर्ष 10 हजार कोटी रुपये देण्यात येईल 

  • राज्यांना इन्टरेस्ट फ्री कर्ज दिली जाणार, 1 वर्षाचा कालावधी यात वाढवला आहे 

  • एआयसाठी ३ केंद्रांची उभारणी भारतातील नामांकीत इन्स्टिट्यूटमध्ये केली जाणार 

  • नॅशनल गर्व्हनन्स पाॅलिटी राबवली जाणार 

  • 5 जीसाठी विकासासाठी 100 लॅब्सची स्थापना केली जाणार 

  • नेट झिरो कार्बनसाठी ग्रीन ग्रोथ 

  • 2030 पर्यंत ग्रीन हायड्रोजन निर्माणचं टार्गेट 5 एमएमटी 

  • 35 हजार कोटी नेट झिरो कार्बन आणि एनर्जी ट्रान्झीशनसाठी दिले जाणार 

  • 13 गीगाव्हॅट रिन्युएबल एनर्जी लद्दाख राज्याच्या माध्यमातून निर्माण करण्याचा विचार ज्यासाठी 20 हजार 700 कोटी रुपयांचा निधी 

  • 10 हजार बायो इनपूट रिसोर्स सेंटरची उभारणी केली जाणार 

  • 1 कोटी शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंगसाठी प्रोत्साहित करणार

Nirmala Sitharaman on Union Budget: सरकार नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅन हा मुख्य आधार बनवेल
सरकार नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणणार आहे
3 आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सेंटर ऑफ एक्सलन्स तयार केले जाईल
पॅन कार्डला कॉमन बिझनेस आयडेंटिफायर, डिजीलॉकर, आधार पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल

Infrastructure Sector: Budget LIVE : पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात काय तरतूद?

Infrastructure Sector: Budget LIVE : पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात काय तरतूद? 



  • ट्रान्सपोर्ट इन्फ्रा प्रोजेक्टवर 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

  • अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जातील

  • गटार साफ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मशीनवर आधारित असेल

  • मिशन कर्मयोगी नागरी सेवकांची कार्यक्षमता वाढविण्याची घोषणा केली

Nirmala Sitharaman on Union Budget: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचे बजेट

Nirmala Sitharaman on Union Budget : रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचे बजेट



  • रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचे बजेट

  • 2013 सालचा विचार करता 9 पटीनं बजेट वाढवलं

Union Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे 

Union Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे 



  • अडीच हजार कोटी रुपये राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करत सहकार क्षेत्राला मदत 

  • नॅशनल डिजिटल लायब्ररी उभारली जाणार 

  • मस्त्य योजनेत 6 हजार कोटी रुपये दिले जाणार 

  • 15 हजार कोटी रुपये पुढील 3 वर्षांसाठी शेड्युल ट्राइब योजनेसाठी दिले जाणार 

  • गरीब लोकांना बेल मिळताना आर्थिक अडचणी येतात, त्यांना देखील मदत केली जाणार 

  • पीएम आवास योजनेचा फंड 66 टक्क्यांनी वाढवला, 79 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार

  • कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठीचा निधी 33 टक्क्यांनी वाढवत 10 लाख कोटींपर्यंत वाढवला

  • रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचे बजेट

  • 2013 साल विचार करता 9 पटीनं बजेट वाढवलं

Union Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

Union Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे 



  • अमृतकाळातील पहिले बजेट 

  • भारतीय अर्थव्यवस्था जगातील ब्राइट स्टार म्हणून पुढे आली आहे 

  • भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर 

  • पर कॅपिटा इन्कम दुप्पट होतंय, 1.97 लाख  

  • भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी पोहोचला आहे 

  • उद्योग धंद्यासाठी भारतात पोषक वातावरण 

  • डिजिटल पेमेंटमध्ये मोठी भरारी, युपीआयचा मोठा वाटा 

  • 11.7 कोटी स्वच्छ भारत अंतर्गत, 9 कोटी उज्ज्वला योजना, पीएम सुरक्षा आणि जीवन ज्योतीत 46 टक्के लोकं 

  • ईपीएफओचा आकडा देखील दुप्पट झाला 

  • सध्याची करंट ग्रोथ 7 टक्के 

  • इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटच्या आधारे मदत करण्यावर भर 

  • फ्री फूड स्कीम पुढील एका वर्षासाठी राबवली जाणार

  • ग्रीन ग्रोथवर विकास, ग्रीन उद्योग, ग्रीन एनर्जीवर भर 

  • कार्बन कमी करण्यासाठी अनेक पर्याय उभे करण्याचा प्रयत्न 

  • वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न

  • जम्मू काश्मीर आणि लद्दाखच्या विकासाला देखील चालना देण्याचा प्रयत्न 

  • शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत अनेक योजनांची उभारणी होतेय 

  • टुरिझमला चालना देण्याचा मिशन मोडमधून प्रयत्न 

  • पीपीपी अंतर्गत उद्योगांची उभारणी करत शेतकऱ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न 

  • अॅग्रीकल्चर स्टार्टअपला चालना देण्याचा प्रयत्न 

  • हाॅर्टीकल्चरसाठी 2 हजार 200 कोटी रुपयांचा निधी 

  • पीएम मत्स्य संपदा योजनेत सब योजना, ज्यात छोट्या उद्योजकांना चालना देण्यात येईल 

  • सहकारासाठी नवं मंत्रालय केलं होतं 

  • शेतकरी क्रेडिट टार्गेट 20 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न 

  • आत्मनिर्भर क्लीन योजना राबवली जाणार 

  • 157 नर्सिंग काॅलेज उघडली जाणार 

India Union Budget 2023-24: वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय?

  • फार्मामधील संशोधनासाठी नवीन संशोधन योजनेची घोषणा

  • राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी राष्ट्रीय स्तरावर करण्याची घोषणा

  • 157 नवीन नर्सिंग कॉलेज बांधले जातील

  • निवडक ICMR लॅबमध्ये सुविधा वाढवल्या जातील

  • संशोधन आणि उत्पादनासाठी वैद्यकीय महाविद्यालये तयार करणार

  • साक्षरतेसाठी स्वयंसेवी संस्थांसोबत एकत्र काम करेल

  • आर्थिक साक्षरतेला चालना देण्यावर भर

  • 63,000 प्राथमिक कृषी कमोडिटी सोसायट्या तयार केल्या जातील

  • NBT डिजिटल लायब्ररीसाठी पुस्तके प्रदान करेल

Budget LIVE: अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत वाढ

Budget 2023 LIVE: पंतप्रधान आवास योजनेचा निधी 66 टक्क्यांनी वाढून 79,000 कोटी रुपयांवर

Nirmala Sitharaman LIVE: अर्थसंकल्पात मत्सपालनासाठी काय तरतूद?

मत्स्यपालनासाठी 60 हजार कोटी रुपयांच्या नवीन सवलतीच्या योजनेची घोषणा

Union Budget 2023 LIVE: पर्यटन, पर्यावरण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद?

Union Budget 2023 LIVE: पर्यटन, पर्यावरण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद? 



  • पर्यटन व्यवसायाला चालना देण्यावर भर

  • पर्यटन क्षेत्रात रोजगार आणि व्यवसायाच्या मोठ्या शक्यता

  • जम्मू-काश्मीर, लडाख आणि ईशान्येकडे सरकारचं लक्ष

Railway Budget 2023: रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद : अर्थमंत्री

  • मत्स्यपालनासाठी सरकार 60,000 कोटी रुपये खर्च करणार

  • पंतप्रधान आवास योजनेची रक्कम 66 टक्क्यांनी वाढून 79 हजार कोटी रुपयांवर

  • मध्य कर्नाटकसाठी 5300 कोटी रुपयांची मदत जाहीर

  • आदिवासी अभियानासाठी 3 वर्षात 15,000 कोटी रुपयांची घोषणा

  • भांडवली खर्चासाठी 10 लाख कोटी रुपये राखून ठेवले आहेत

  • राज्यांना बिनव्याजी कर्जाची मर्यादा 1 वर्षासाठी वाढवली

  • रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा

  • मुलांसाठी आणि तरुणांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यात येणार आहे

  • पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले ​​जाईल.

  • शेतीशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिले जाईल.

  • 2014 पासून विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.

India Union Budget 2023: मोदी सरकारचे मिशन 7 काय?

अमृतकाळामध्ये सरकारचे 7 प्राधान्य


इन्फ्रा, गुंतवणूक, कनेक्टिव्हिटीचा सात प्राधान्यक्रमांमध्ये समावेश



  1. सर्वसमावेशक विकास

  2. शेवटच्या घटकापर्यंत विकास 

  3. पायाभूत सुविधांचा विकास

  4. क्षमतांमध्ये वाढ करणे

  5. ग्रीन ग्रोथ

  6. युवाशक्ती

  7. आर्थिक क्षेत्र

Nirmala Sitharaman on Union Budget 2023 : कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा : अर्थमंत्री

Nirmala Sitharaman on Union Budget 2023 : कृषी क्षेत्रात काय घोषणा? 


अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिले जाईल. यासाठी, तरुण उद्योजकांद्वारे कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड तयार केला जाईल.



  • कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा

  • हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे

  • स्वयंपूर्ण स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी 2200 कोटी रुपयांची घोषणा

  • कापसासाठी क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजनेची घोषणा

  • पोषण, अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल

  • कृषी स्टार्टअप्स निर्माण करण्यावर सरकारचा भर. भारताला बाजरींचे जागतिक केंद्र बनविण्यावर भर.

  • बचत गटांवर भर देऊन आर्थिक सक्षमीकरणावर सरकारचा भर असेल.

  • सरकार कृषी क्षेत्रासाठी साठवण क्षमता- गोडाऊन वाढवणार आहे

  • मत्स्यापालनासाठी 20 लाख कोटी

  •  

Union Budget 2023 LIVE: आर्थिक विकास दर 7 टक्के असण्याचा अंदाज : अर्थमंत्री

Union Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन म्हणाल्या की, चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7% असण्याचा अंदाज आहे, जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. ते म्हणाले की पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.


अर्थमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :



  • इन्फ्रा, गुंतवणूक, कनेक्टिव्हिटीचा सात प्राधान्यक्रमांमध्ये समावेश

  • जम्मू-काश्मीर, लडाख आणि ईशान्येकडे सरकारचे लक्ष

  • कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या निधीची घोषणा, हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार

  • स्वयंपूर्ण स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी 2200 कोटी रुपयांची घोषणा

  • कापसासाठी क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजनेची घोषणा

  • पोषण, अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल

  • कृषी स्टार्टअप्स निर्माण करण्यावर सरकारचा भर. भारताला बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्यावर भर

Union budget 2023 live: 2023 च्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यावर केंद्रित आहे

Budget  2023 चे उद्दिष्ट अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणे, रोजगार निर्मिती आणि स्थूल आर्थिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणे आहे

Budget in Indian Parliament LIVEUnion Budget 2023: भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था : अर्थमंत्री

Budget 2023: भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की सरकारच्या 2014 पासूनच्या प्रयत्नांमुळे सर्व नागरिकांचे जीवनमान आणि सन्माननीय जीवन सुनिश्चित झाले आहे. दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून 1.97 लाख रुपये झाले आहे. या 9 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे. 


अर्थमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 



  • अर्थव्यवस्था नेहमीपेक्षा अधिक सुस्थितीत 

  • 220 कोटी कोविड लसी दिल्या

  • अमृतकाळासाठी तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित

  • 2.2 लाख कोटी रुपयांचे थेट रोख हस्तांतरण

  • ईपीएफओ सदस्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली

  • भारतीय अर्थव्यवस्था जगातील दहाव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरून पाचव्या स्थानावर पोहोचली 

  • 2022 मध्ये 1.24 लाख कोटी रुपयांचे UPI व्यवहार झाले

  • राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचा विस्तार

  • ग्राहक बाजारपेठ वाढवण्यासाठी उत्पादक उपक्रमांची स्थापना केली जाईल

  • राज्यांसोबत मिशन मोडवर काम सुरू 

  • पर्यटन व्यवसायाला चालना देण्यावर भर

Union Budget 2023 LIVE: भारतीय अर्थव्यवस्था चमकता तारा : अर्थमंत्री

Union Budget 2023 LIVE : निर्मला सीतारामन म्हणाल्या, जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. त्या म्हणाले की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.

Union Budget 2023 Live : अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प : अर्थमंत्री

Union Budget 2023 Live : निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्या म्हणाल्या की, अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जगाने भारताची ताकद ओळखली आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे.


पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.


अर्थमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 



  • अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प

  • पुढील 25 वर्षांसाठी बजेट ब्लू प्रिंट

  • जगात मंदी असूनही, जीडीपी वाढीचा अंदाज 7 टक्के 

  • भारताची ताकद जगाने ओळखली

  • समाजातील सर्व घटकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रीत केलंय 

  • आर्थिक प्रगतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न

  • सशक्त धोरणांमुळे आम्ही अधिक चांगलं काम करु शकलो. 

  • सुधारणांवर लक्ष केंद्रीत केलं. 

  • कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली.

  • सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले.

  • प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्न दुप्पट

  • 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.

  • PMGKAY वर 2 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा भार केंद्र सरकार उचलणार आहे.


 

Budget 2023 Live: अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात

Budget 2023 Live: अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात  


पाहा लाईव्ह : 


Budget in Indian Parliament LIVE: प्राप्तिकरात सूट (Income Tax) देण्याची सर्वाधिक मागणी

Budget in Indian Parliament LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) काही मिनिटांतच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा स्थितीत या वेळी अर्थमंत्र्यांच्या पेटीत करमाफीची भेट येईल, अशी आशा मध्यमवर्गीय कुटुंबाला आहे. काही लोक 80C ची व्याप्ती वाढवून 2 लाख रुपये करण्याची मागणी करत आहेत. यापूर्वी, 2020-21 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन सवलतीच्या आयकर प्रणालीची घोषणा केली होती, ज्यामध्ये कमी कर दर लागू करण्यात आले होते.


आतापर्यंत 0-2.50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण आयकर सूट आहे. 2.50-5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कराची तरतूद आहे. 5 ते 7.50 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना आता 10 टक्के कर भरावा लागणार आहे, तर 7.50 ते 10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना आता 15 टक्के कर भरावा लागणार आहे. 10 ते 12.50 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के कर भरावा लागेल. 12.50 ते 15 लाख रुपये कमावणाऱ्यांना 25 टक्के कर भरावा लागेल. दुसरीकडे, ज्यांचे उत्पन्न 15 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा लोकांना 30 टक्के कर भरावा लागेल. 

Union Budget 2023 LIVE: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी

Union Budget 2023 LIVE: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी देण्यात आली आहे. काही मिनिटांतच अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. 

India Union Budget 2023: ट्रकभरुन अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनात दाखल

India Union Budget 2023: ट्रकभरुन अर्थसंकल्पाच्या प्रती संसद भवनात दाखल 



Union Budget 2023-24 LIVE : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली

Union Budget 2023-24 LIVE : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली



Budget 2023 Live Updates: पंतप्रधान मोदी संसद भवनात पोहोचले

Budget 2023 Live Updates: पंतप्रधान मोदी संसद भवनात पोहोचले.

Union Budget LIVE: राजनाथ सिंह आणि अमित शहा संसद भवनात पोहोचले

Union Budget LIVE: सकाळी 11 वाजल्यापासून अर्थसंकल्प सादर होणार आहे. तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसद भवनात पोहोचले आहेत. 

Budget in Indian Parliament LIVE : अर्थसंकल्पासाठी दहा दिवस बंदिवासात, अर्थमंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी 14 हजार 400 मिनिटं जगापासून डिसकनेक्टेड

Budget in Indian Parliament LIVE : देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) तयार करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज  (1 फेब्रुवारी) संसदेत (Parliament) मांडणार आहेत. आपण आपल्या घराचे बजेट जसे बनवतो त्याच पद्धतीने देशाचे बजेट बनवले जाते. रुपयाचे उत्पन्न किती असेल? त्यातून मुलांच्या फीवर किती पैसे खर्च होणार आहेत. खाद्यपदार्थांवर किती रक्कम खर्च करावी लागेल. त्याचप्रमाणे सरकार देशाचा अर्थसंकल्प तयार करते. शेकडो अधिकाऱ्यांची फौज मिळून देशाचा अर्थसंकल्प तयार कराते. अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी, अर्थ मंत्रालय उद्योग संघटना आणि सर्व क्षेत्रांकडून सूचना मागवते. त्यानंतर बजेटला अंतिम स्वरुप दिलं जातं. अर्थसंकल्पाला अंतिम रुप देण्यासाठी अधिकारी सुमारे 10 दिवस बंदिवासात असतात.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Budget 2023 live updates: केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक लवकरच सुरू होणार आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक लवकरच सुरू होणार आहे.

Union Budget 2023 LIVE Updates: 'बही खाता' घेऊन निर्मला सीतारमण संसदेत दाखल

Union Budget 2023 LIVE Updates: काही वेळापूर्वी अर्थमंत्री सीतारमण यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली... थोड्याच वेळात  कॅबिनेटच्या बैठकीत हा अर्थसंकल्प मांडण्यात येईल... आणि मंजुरी मिलाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प संसदेत सादर करतील... पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता  वर्तवली जात आहे.  लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, कृषी क्षेत्रासाठी दिलाशाची पेरणी होणार का?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. त्याचबरोबर जगातील अनेक देश हे मंदीच्या उंबरठ्यावर आहे, त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती ही बरीच चांगली आहे... जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे... त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात काय-काय असणार आहे. याकडे सर्वसामान्यांसह गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय... 

Union Budget 2023 LIVE Updates: बही खाता' घेऊन निर्मला सीतारमण संसदेत दाखल

Union Budget 2023 LIVE Updates: काही वेळापूर्वी अर्थमंत्री सीतारमण यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली... थोड्याच वेळात  कॅबिनेटच्या बैठकीत हा अर्थसंकल्प मांडण्यात येईल... आणि मंजुरी मिलाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प संसदेत सादर करतील... पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता  वर्तवली जात आहे.  लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, कृषी क्षेत्रासाठी दिलाशाची पेरणी होणार का?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. त्याचबरोबर जगातील अनेक देश हे मंदीच्या उंबरठ्यावर आहे, त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती ही बरीच चांगली आहे... जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे... त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात काय-काय असणार आहे. याकडे सर्वसामान्यांसह गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय... 

Union Budget 2023: मोदी सरकारच्या पोतडीतून काय निघणार? अर्थसंकल्पाकडून अनेकांना अपेक्षा

Union Budget 2023: आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात मोदींच्या पोतडीतून सर्वसामान्यांना काय मिळणार? शेतकरी, महिला, गुंतवणूकदारांना आजच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर करदात्यांचीही उत्सुकता वाढली आहे. आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडणार आहेत. 

Railway Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला सर्वाधिक निधी मिळण्याची शक्यता

Union Budget LIVE : Railway Budget 2023 : यावर्षी रेल्वेवर सर्वाधिक जोर देण्यात आल्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अर्थसंकल्पात रेल्वेला 1.4 लाख कोटी निधी मिळाला होता. यावर्षी त्यात 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंदाजे 1.8 लाख कोटींचा निधी रेल्वेला मिळेल, अशी शक्यता आहे. त्यात नवीन रेल्वे मार्ग, नवीन हाय स्पीड ट्रेन, वंदे भारत सारख्या सेमी हाय स्पीडला अधिक प्राधान्य, बुलेट ट्रेन प्रोजेक्टला अधिक निधी, मिळण्याची शक्यता आहे. 
गेल्या काही महिन्यात जे अपघात झाले, त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा, टेक्नॉलॉजी वापरून सुरक्षेकडे भर दिला जाण्याची शक्यता आहे. नवा म्हणजेच, हायड्रोजनवर धावणारी ट्रेनचा प्रोजेक्ट जाहीर होण्याची शक्यता आहे. 

India Union Budget 2023 : जगात मंदीचं सावट, भारताची पावलं कशी?

India Union Budget 2023 : केंद्राचा अर्थसंकल्प आज जाहीर होणारेय, मोदी सरकारच्या काळातील हा नववा अर्थसंकल्प असून संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे, सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प मांडतील. पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता अर्थ वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, कृषी क्षेत्रासाठी दिलाशाची पेरणी होणार का?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. त्याचबरोबर जगातील अनेक देश हे मंदीच्या उंबरठ्यावर आहे, त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती ही बरीच चांगली आहे. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात काय-काय असणार आहे. याकडे सर्वसामान्यांसह गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय.

Union Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पात कुणाला काय? महागाईतून दिलासा मिळणार? आज संसदेत अर्थसंकल्प सादर होणार

Union Budget 2023 LIVE: पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता अर्थ वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, कृषी क्षेत्रासाठी दिलाशाची पेरणी होणार का? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

Indian Budget 2023 LIVE : आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प पटलावर ठेवणार

Union Budget LIVE: केंद्राचा अर्थसंकल्प आज जाहीर होणारेय, मोदी सरकारच्या काळातील हा नववा अर्थसंकल्प असून संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे, सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प मांडतील. 

Indian Budget 2023 LIVE : महागाई तुमचे बजेट बिघडवणार नाही! IMF चा अहवाल

Indian Budget 2023 LIVE : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey) सादर करण्यात आला. यानंतर महागाई दराच्या आघाडीवर देशातील सामान्य माणसाला आगामी काळात आणखी दिलासा मिळू शकतो, कारण महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे. भारतातील महागाईचा दर 31 मार्च रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षात 6.8 टक्क्यांवरून पुढील आर्थिक वर्षात 5 टक्क्यांवर येऊ शकतो. वर्ष 2024 मध्ये तो आणखी 4 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) हा अंदाज व्यक्त केला आहे.


काय आहे IMF चा अहवाल, वाचा सविस्तर 

Economic Survey 2022-23 : 2023-24 मध्ये सेवा क्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून अंदाज व्यक्त

Economic Survey 2022-23: 2022-23 या वर्षात सेवा क्षेत्राची वाढ खूप चांगली झाली आहे. सेवा क्षेत्राने 8.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये सेवा क्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. 


कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पूर्ण झाली आहे, म्हणजेच कोरोनाच्या काळात झालेली पिछेहाट यावर्षी भरुन निघाल्याचा दावाही संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला आहे.


सेवा क्षेत्राला बँकांकडून होणाऱ्या वित्तपुरवठ्यातही सकारात्मक वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल 21 टक्क्यांची आहे. वैद्यकीय पर्यटन म्हणजे वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून भारतात येणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याऱ्या जगातील 46 देशांमध्ये भारताचा क्रमांक दहावा असल्याची माहिती आर्थिक अहवालात नोंदवण्यात आली आहे. 

Economic Survey 2022-23 : कृषी क्षेत्रात 4.6 टक्क्यांची वाढ; आर्थिक सर्वेक्षणात दिलासादायक बाब

Economic Survey 2022-23 :  अर्थसंकल्पापूर्वी  (Budget 2023) आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत (Budget Session) मांडला. देशाच्या कृषी क्षेत्राने (Agriculture Sector) सहा वर्षांत सरासरी वार्षिक 4.6 टक्के वाढ नोंदवली असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात आणि अन्नसुरक्षेत कृषी आणि त्याच्याशी संबंधित घटकांनी मोठी जबाबदारी पार पाडली असल्याचे आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) अहवालात नमूद करण्यात आले. मागील काही वर्षात भारत कृषी उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून नावारुपास आला असल्याचेही अहवालात म्हटले. वर्ष 2021-22 मध्ये निर्यात ही 50.2 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर पोहचली. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Union Budget 2023 LIVE: आज सकाळी 10 वाजल्यापासून अर्थ बजेटचा फक्त एबीपी माझावर... 

Union Budget 2023 LIVE : आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून अर्थ बजेटचा फक्त एबीपी माझावर... 


 


Economic Survey : काल अर्थमंत्र्यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला, आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतोय?

Economic Survey 2021-22 : काल (मंगळवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला. अहवालात 2023-24 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर साडे सहा टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


देशाच्या कृषी क्षेत्राने वार्षिक 4.6 टक्के वाढ नोंदवली असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. देशाच्या विकासात आणि अन्नसुरक्षेत कृषी आणि त्याच्याशी संबंधित घटकांनी मोठी जबाबदारी पार पाडली असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात (Economic Survey) अहवालात नमूद करण्यात आले. मागील काही वर्षात भारत कृषी उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून नावारुपास आला असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. वर्ष 2021-22 मध्ये निर्यात ही 50.2 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर पोहचली. तर 2022-23 या वर्षात सेवा क्षेत्राची वाढ खूप चांगली झाली असून सेवा क्षेत्राने 8.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये सेवा क्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 

Union Budget 2023: काय स्वस्त... काय महाग? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार, संसदेत अर्थसंकल्प सादर होणार

Union Budget 2023: देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार की त्यांना दिलासा मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या आज देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2023) संसदेत मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि विविध क्षेत्रांना काय मिळणार याची स्पष्टता आज दुपारपर्यंत होणार आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

India Union Budget 2023 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार

India Union Budget 2023 : केंद्र सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पटलावर ठेवतील. मोदी सरकारच्या काळातील हा नववा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे निवडणूक पूर्व अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय असणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. 

पार्श्वभूमी

Union Budget 2023 Live Updates: देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार की, त्यांना दिलासा मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या आज देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) संसदेत मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि विविध क्षेत्रांना काय मिळणार याची स्पष्टता आज दुपारपर्यंत होणार आहे. 


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवार, 31 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. सोमवारी राष्ट्रपतींच्या (President Droupadi Murmu) अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर संसदेत देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर आज अर्थसंकल्पाचा दुसरा दिवस असून आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. 


Economic Survey: आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतोय? 


देशाच्या कृषी क्षेत्राने वार्षिक 4.6 टक्के वाढ नोंदवली असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात (Economic Survey 2022) नमूद करण्यात आलं आहे. देशाच्या विकासात आणि अन्नसुरक्षेत कृषी (Agriculture Sector) आणि त्याच्याशी संबंधित घटकांनी मोठी जबाबदारी पार पाडली असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात (Economic Survey) अहवालात नमूद करण्यात आले. मागील काही वर्षात भारत कृषी उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून नावारुपास आला असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. वर्ष 2021-22 मध्ये निर्यात ही 50.2 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर पोहचली. तर 2022-23 या वर्षात सेवा क्षेत्राची वाढ खूप चांगली झाली असून सेवा क्षेत्राने 8.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये सेवा क्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 


चालू वर्षात 6.8 टक्के विकास वाढीचा अंदाज 


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक (World Economic Outlook) या अहवालात  भारताच्या जीडीपी वाढीच्या दराविषयी भाकित केलं आहे. IMF च्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षात 6.8 टक्के इतका भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर असेल, पुढील वर्षी हा दर 6.1 टक्के अपेक्षित आहे तर त्यापुढील म्हणजे 2024-25 मध्ये आर्थिक वृद्धी दर (GDP Growth Rate) 6.8 टक्के राहिल असा अंदाज आहे. गेल्या दहा वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असल्याचा दावा मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Advisor) अनंत नागेश्वरन (V. Anantha Nageswaran) यांनी केला आहे.  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागारांनी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक अहवालातील बारकावे स्पष्ट केले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.