Budget 2021 PM Modi Speech केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच देशाचा यंदाच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. विरोधकांनी जिथं अपेक्षेप्रमाणं अर्थसंकल्पावर निशाणा साधला तिथंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया देत देशाच्या दृष्टीनं हा विकास आणि विश्वासाचा अर्थसंकल्प आहे, असं मत मांडलं.


अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलेल्या प्रवर्गांचा उल्लेख करत मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं त्यामध्ये कशा प्रकारे तरतुदी करण्यावर भर देण्यात आला आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. शिवाय या अर्थसंकल्पामुळं देशात येत्या काळात सकारात्मक बदल घडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Budget 2021 Speech Highlights | 2021-22 आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्र्यांकडून बजेट सादर; कोणत्या क्षेत्राला किती कोटींचा निधी?


पंतप्रधानांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे 


- आजच्या अर्थसंकल्पानं देशाचा आत्मविश्वास सर्वांपुढं आणला आहे. संपूर्णपणे आत्मनिर्भरतेकडे कल असणाऱ्या या अर्थसंल्पाकडे समाजातील प्रत्येक विभागाला प्राधान्य देण्यात आलं आहे.


- शेतकऱ्यांची मिळकत वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलं असून त्यासाठी पावलंही उचलण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना यापुढं अधिक सोप्या पद्धतीनं कर्ज मिळू शकणार आहे. एपीएमसी मार्केटना आणखी बळकटी देण्यासाठीच्या तरतुदी करणयाक आल्या आहेत.


- यंदाच्या अर्थसंकल्प हा असाधारण परिस्थितीमध्ये सादर करण्यात आला आहे. कोरोना काळात जगभरात जे परिणाम पाहायला मिळाले त्यामुळं संपूर्ण मानव प्रजातीलाच हादरा बसला. त्यामुळं या काळात सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प देशाता आत्मविश्वास वाढवणारा आहे.


- अनेकांनाच वाटलं होतं की आम्ही मध्यमवर्गीयांवरील काराचा भार वाढवू. पण, आम्ही मात्र या अर्थसंकल्पामध्ये शक्य तितकी पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.


- देशातील तरुण पिढीसाठी नव्या संधी, मानव संसाधनांना एक नवा स्तर, विविध क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांची वाढ, नव्या तंत्रज्ञानामुळं प्रगतीच्या नव्या वाटा या गोष्टींना यंदाच्या अर्थसंकल्पात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.


- महिलांच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यासाठी काही महत्त्वाचे रचनात्मक बदलही करण्यात आले आहेत. ज्यामुळं रोजगार वाढीसाछीही फायदा होणार आहे.


- Individuals, Industry, Investors सह पायाभूत सुविधांमध्येही अर्थसंकल्पीय तरतुदींमुळं सकारात्मक बदल होणार आहेत.