Union Budget 2021 Speech Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यासोबत अर्थमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटची घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्रापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत तसेच कृषी क्षेत्रासाठीही बजेटची घोषणा करण्यात आली. जाणून घेऊया कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटी रुपये देण्यात आले.


कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटींचं बजेट?


1. कोरोना काळात सरकारने आरोग्य आणि हेल्थकेयर क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी देण्यात आला असून तो 137 % इतका वाढला आहे.
2. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच गरज भासल्यास सरकारद्वारे आणखी निधी देण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे.
3. आत्मनिर्भर आरोग्य योजनेसाठी 64 कोटी रुपयांचं बजेट मंजूर करण्यात आलं आहे.
4. स्वच्छ भारत मिशनसाठी आरोग्यमंत्र्यांच्या पेटाऱ्यात 1.41 लाख कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं आहे.
5. यंदा सरकारद्वारे रेल्वेसाठीही 1.07 लाख कोटींच्या बजेटची घोषणा करण्यात आली आहे.
6. रस्त्यांसाठी बजेट 2021-22 मध्ये अर्थमंत्र्यांनी 1.18 कोटी रुपयांच्या बजेटची घोषणा करण्यात आली आहे. या बजेटमार्फत देशातील रस्ते आणि सुव्यवस्थेसाठी तरतूद करण्यात आली आहे.
7. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, सार्वजनिक बस परिवहन सेवांसाठी 18 हजार कोटी रुपयांची एक नवी योजना लॉन्च करण्यात आली येईल.
8. विमा कंपन्यांमध्ये FDI ला 49 टक्के वाढवून 74 टक्के करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
9. जल जीवन मिशनसाठी 2.28 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
10. वायू प्रदूषणा रोखण्यासाठी 2.21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
11. सरकार बँकांसाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
12. विधानसभा निवडणुका असणाऱ्या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसामसाठी अर्थमंत्र्यांनी निधी मंजूर केला आहे. निवडणुका असणाऱ्या मोठ्या राज्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एकूण 2.27 लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे.
13. एमएसपी वाढवून उत्पादनानुसार, 1.5 पटींनी वाढवला आहे.
14. आदिवासी भागांतील शाळांसाठी 38 कोटी रुपये देण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :