Budget 2020 LIVE | काय स्वस्त, काय महाग?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या लाल खतावणीकडे देशाचं लक्ष आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात. निर्मला सीतारमण यांच्यासमोर अर्थसंकल्पात संतुलन कायम ठेवण्याचं आव्हान आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Feb 2020 02:33 PM
स्वस्त : न्यूजप्रिंट, पेपर
महाग : वैद्यकीय उपकरणं, चप्पल, फर्निचर, सिगरेट आणि तंबाखुजन्य पदार्थ
दशकाची दिशा देणारा अर्थसंकल्प; शेती, पायाभूत सुविधांना चालना मिळेल, अर्थमंत्री आणि पंतप्रधान यांचं अभिनंदन : देवेंद्र फडणवीस
करदात्यांना कर आकारणीसाठी नवीन आणि जुने टॅक्स स्लॅब निवडण्याचं स्वातंत्र्य
साडे सात ते दहा लाख उत्पन्नावर 15 टक्के
दहा ते साडेबारा लाख उत्पन्नावर 20 टक्के कर
पाच ते साडेसात लाख उत्पन्नावर 10 टक्के कर
कॉर्पोरेट टॅक्स 25 टक्क्यांवरुन 22 टक्क्यांवर तर नव्या उत्पादन कंपन्यांसाठी 15 टक्के कॉर्पोरेट टॅक्स
कॉर्पोरेट टॅक्स 25 टक्क्यांवरुन 22 टक्क्यांवर तर नव्या उत्पादन कंपन्यांसाठी 15 टक्के कॉर्पोरेट टॅक्स
कॉर्पोरेट टॅक्स 25 टक्क्यांवरुन 22 टक्क्यांवर तर नव्या उत्पादन कंपन्यांसाठी 15 टक्के कॉर्पोरेट टॅक्स
अर्थ बजेटचा : कर कायद्यांनध्ये सुधारणा करण्यावर सरकारचा भर, “बॅंकांच्या भरती प्रक्रियांमध्ये सुधारणा करु” - अर्थमंत्री
कर कायद्यामधील सुधारणांवर सरकारचा भर : अर्थमंत्री
राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाची स्थापना करणार - अर्थमंत्री
स्वच्छ भारत योजनेसाठी 12,300 कोटींची तरतूद, ग्रामीण भागाच्या विकासासाठी 1.2 लाखांची तरतूद, जलजीवन योजनेसाठी 11,500 कोटींची तरतूद - अर्थमंत्री
देशाची नवी एज्युकेशन पॉलिसी लवकरच, शिक्षण क्षेत्रातही एफडीआय आणणार, मार्च 2021 पर्यंत डिप्लोमा कोर्सेससाठी दीडशे नव्या संस्था निर्माण करणार
रोजगार देणाऱ्या शिक्षणावर भर देणार, डिप्लोमासाठी 2021 पर्यंत नवीन संस्था उभारणार
शिक्षण क्षेत्रासाठी एडीआय आणणार, शिक्षण क्षेत्रासाठी 99,300 कोटींची तरतूद, कौशल्य विकाससाठी 3 हजार कोटींची तरतूद - अर्थमंत्री
2025 पर्यंत भारत टीबी मुक्त करणार, टीबी हारेगा, भारत जितेगा अभियान राबवणार- अर्थमंत्री
मिशन इंद्रधनुष योजनेचा विस्तार करणार, आयुष्यमान भारत योजनेत नवीन 20 हजार नवीन रुग्णालयांचं लक्ष्य- अर्थमंत्री
शेती आणि संबंधित क्षेत्रावर पुढच्या आर्थिक वर्षात 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करणार. शेती, सिंचन, ग्राम सुधारणा आणि पंचायती राज यासाठी ही तरतूद.
पाण्याची कमतरतेसंबंधित मुद्दे आता देशातील चिंतेचा विषय आहे, पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाययोजना करण्याचा प्रस्ताव : अर्थमंत्री
दूध उत्पादन 2025 पर्यंत दुप्पट करण्याचं लक्ष्य, दूध उत्पादकांसाठी सरकारकडून खास योजना- अर्थमंत्री
शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक तातडीने व्हावी यासाठी किसान रेल चालवणार. दूध मांस मासे यांच्या वाहतुकीसाठी किसान रेल. हॉर्टिकल्चरमध्ये एक जिल्हा एक उत्पादन अशा समूह योजनांवर भर देणार
मासेमारीला उत्तेजन देण्यासाठी सागर मित्र योजना.. देशातले उत्पादन 200 लाख टन करण्याचे लक्ष्य.
शेतकऱ्यांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद- अर्थमंत्री
कृषी उडाण योजनेची सुरुवात करणार, दूध, मांस, भाजीपाला वाहतुकीसाठी रेल्वे सेवा सुरु कारणार - अर्थमंत्री
कृषी क्षेत्रासाठी 16 सूत्रीय अॅक्शन प्लान, 20 लाख शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजना, पाणीटंचाई असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी खास योजना - अर्थमंत्री
अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्समध्ये 113 अंकांची वाढ
20 लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप देणार, देशातले पाणी संकटातले 100 जिल्हे या चिंतेतून मुक्त करणार : अर्थमंत्री
2014-19 मध्ये एफडीआय वाढून 284 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे, 2019 मध्ये भारत सरकारचं कर्ज कमी होऊन जीडीपीच्या 48.7 टक्के राहिलं आहे : अर्थमंत्री
2006 ते 2016 या दहा वर्षात देशातील 27 कोटी 10 लाख जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश : अर्थमंत्री
हमारा वतन खिलते शालीमार जैसा, हमारा वतन डल झील में खिलते कमल जैसा, नौजवानो के गरम खून जैसा, मेरा वतन...तेरा वतन... दुनिया का सबसे प्यारा हमारा वतन : अर्थमंत्री
या एप्रिल महिन्यापासून जीएसटी परतावा भरण्याची नवी सोपी प्रणाली आणणार : अर्थमंत्री
पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना लाभ, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सरकारचं लक्ष्य, 6.11 कोटी शेतकऱ्यांसाठी विमा योजना - अर्थमंत्री
आरोग्य, शिक्षण, रोजगारावर सरकारचा भर, अर्थसंकल्पात गरीबांसाठी खास योजना : अर्थमंत्री
आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर केंद्र सरकारचा भर असणार - अर्थमंत्री
बँकांची स्थिती मजबूत झाली, 60 लाख नवे करदाते तयार झाले : अर्थमंत्री
जीएसटीमुळे एकच टॅक्स, त्यामुळे देशाला फायदा झाला, वस्तूंवरील कर कमी झाला, लघू आणि मध्यम उद्योगांना फायदा : अर्थमंत्री
राज्य आणि केंद्र सरकार एकत्र येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाणार : अर्थमंत्री
सर्वसामान्यांना जे हवं आहे ते या अर्थसंकल्पातून मिळणार : अर्थमंत्री
लोकसभेत निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पाच्या वाचनास सुरुवात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर राष्ट्रपती भवनकडे रवाना, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घेणार

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी हनुमानची पूजा केली. हा अर्थसंकल्प देशासाठी चांगला ठरावा, अशी आशा आहे, असं ठाकूर म्हणाले.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंत्रालयात पोहोचल्या. इथे फोटोसेशन होईल. त्यानंतर सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रपती भवनात जातील.
मोदी सरकार 2.0 चा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला दुसरा अर्थसंकल्प मांडतील. या अर्थसंकल्पाकडे सामन्य जनतेसह तरुण, महिला, विद्यार्थी, उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांचं लक्ष लागलं आहे.

पार्श्वभूमी

Union Budget 2020 Live Updates : डळमळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीची वाढती समस्या पाहता मोदी सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. यंदा मध्यमवर्ग, व्यापाऱ्यांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या लाल खतावणीकडे देशाचं लक्ष आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात. निर्मला सीतारमण यांच्यासमोर अर्थसंकल्पात संतुलन कायम ठेवण्याचं आव्हान आहे. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात काय खास आहे, याचा तुमच्यावर काय परिणाम होणार? या अपडेट्ससाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com



सकाळी 11 वाजता बजेट सादर होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 8.50 वाजता घरातून बाहेर पडली. 9 वाजता अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांसोबत फोटोसेशन होईल. यानंतर अर्थसंकल्प 2020-21 सादर करण्यासंदर्भात औपचारिक परवानगी घेण्यासाठी त्या राष्ट्रपती भवनात जातील. राष्ट्रपती भवनातून अर्थमंत्री मंत्रिमंडळ बैठकीसाठी संसदेत जातील, तिथे अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. यानंतर निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता लोकसभा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.

टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता
अर्थसंकल्पात सर्वसामन्यांसाठी उत्सुकतेचा भाग असतो कर रचनेची घोषणा. यंदा मंदीमुळे महसुलात वाढ करणं आणि करामध्ये कपात करुन उत्पन्न वाढवणं हे अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे सरकार अर्थसंकल्पात टॅक्स रचनेाबत दिलासा देण्याची शक्यता आहे.
- पाच लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न करमुक्त होऊ शकतं.
- मागील वर्षी पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांनाच करमुक्त केलं होतं.
- परंतु ज्याचं उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता.
- सध्या अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर आकारला जातो.
- पाच ते दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जातो.
- दहा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आकारण्यात येतो.
- याशिवाय पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना 12,500 रुपयांची सूट देण्यात आली होती. म्हणजेच पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही.


आर्थिक सर्वेक्षणात विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2019-2020 या आर्थिक वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण काल (31 जानेवारी) लोकसभेत सादर केलं आहे. या सर्वेक्षणात 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार चालू वर्षात आर्थिक विकासदर 5 टक्के राहू शकतो. त्यामुळे विकासदर वाढवण्यासाठी सरकारची तिजोरी रिकामी करावी लागेल. आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे की, नवे व्यवसाय सुरु करण्यासाठी, मालमत्तेच्या नोंदणीसाठी, कर भरणे, कराराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी नवे उपाय योजण्याची आवश्यकता आहे.


शेअर बाजार आज खुला राहणार
देशाचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार असल्याने शेअर बाजार आज पूर्ण दिवस खुला राहणार आहे आणि सामन्य कामकाज होणार. आज शनिवार आहे. शेअर बाजार शनिवार आणि रविवारी बंद असतो. विशेष परिस्थितीत शेअर बाजार खुला राहतो. शेअर बाजार आज सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3.30 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.


संबंधित बातम्या


संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर, आर्थिक वर्षात विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा यंदाचा अखेरचा अर्थसंकल्प?


Budget 2020 | आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाकडे सर्वांचं लक्ष



Financial Budget | अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे |WEB EXCLUSIVE | ABP Majha



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.