एक्स्प्लोर

शेअर बाजारातील तेजीला ब्रेक लागणार? व्यापार युद्ध अन् मंदीमुळं खेळ बिघडण्याची शक्यता, ब्रोकरेज फर्मनं गुंतवणूकदारांची धाकधूक वाढवली

Share Market : भारतीय शेअर बाजारात सलग पाच दिवस तेजी सुरु आहे.याच दरम्यान ब्रोकरेज फर्म नोमुरानं गुंतवणूकदारांची धाकधूक वाढवणारा अंदाज व्यक्त केला आहे.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात स्थिरता दिसत असून सलग पाच दिवस तेजी दिसून येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्क आकारणीला दिलेली स्थगिती याचा परिणाम देखील शेअर बाजारावर दिसून आला आहे. दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांकडून देखील भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवत शेअर खरेदी करण्यात आल्यानं तेजी दिसून आली. भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण दिसत असलं तरी आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म नोमुरानं आगामी कालावधीसाठी चिंता व्यक्त केली आहे. मार्च 2026 पर्यंत निफ्टी 50  निर्देशांक 24970  अंकांवर पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजे सध्या निफ्टी 50 निर्देशांक ज्या स्थितीत आहे त्यामध्ये  केवळ 3 टक्क्यांची वाढ होऊ शकते. 


नोमुरा फर्मनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादलं जाणारं टॅरिफ, भारतीय कंपन्यांच्या कमाईमधील घसरणीचा अंदाज आणि जागतिक मंदीमुळं  निफ्टी 50 निर्देशांकाच्या वाढीसंदर्भातील अंदाज घटवला आहे. सध्या भारतीय बाजारातील जोखीम कमी होत आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून पुन्हा खरेदी होईल, अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी गेल्या सहा महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेण्यात आले आहेत. 

नोमुरानं त्यांच्या रिपोर्टनुसार 18.5x च्या जुन्या मुल्यांकनाच्या गुणांकाला वाढवून 19.5x केला आहे. बाँड यील्ड मधील घसरण लक्षात घेण्यात आली आहे. याशिवाय देशांतर्गत सेक्टर, ग्राहक आणि वित्तीय कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यावेळी आयटी, मेटल्स , ऑटो आणि फार्मा या सारख्या निर्यातीच्या क्षेत्रातील विभाग पिछाडीवर आहेत. 


नोमुराच्या अंदाजानुसार भारताला अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापारी करारामुळं फायदा होऊ शकतो. याशिवाय पुरवठा साखळीच्या ठिकाण बदलाचा फायदा भारताला होण्याची स्थिती आहे. याशिवाय भारताची अर्थव्यवस्था सध्या स्थिर आहे. भारताला घसरणाऱ्या  कच्चा तेलाचा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, नोमुराच्या अंदाजानुसार अमेरिका भारतासोबत सहजपणे व्यापारी करार करणार नाही. टॅरिफ घटवण्यासह इतर गोष्टींमध्ये देखील सूट मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल. त्यामुळं व्यापारी कराराला दिरंगाई होईल. यामुळं टॅरिफ कमी झालं तरी ते उच्चांकी स्तरावर असल्यास बाजारात अनिश्चितता दिसत आहे.  

जीडीपी 5.8 टक्के राहण्याचा अंदाज

नोमुरानं सध्या कंपन्यांच्या कमाईतील घसरणीचा अंदाज देखील जोखीम आहे, असं म्हटलंय. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा  जीडीपी विकास दर 5.8 टक्के राहील असा अंदाज आहे. जो सध्याच्या अपेक्षांपेक्षा कमी आहेया स्थितीत कंपन्यांच्या कमाईचा वेग देखील वेगवान राहणार नाही,असा अंदाज वर्तवला आहे. 

अखेर नोमुरानं म्हटलं की नजीकच्या भविष्यात इक्विटी मूल्यांकनाचा बाँड यील्डसच्या घसरणीत पाठिंबा मिळू शकतो. नोमुराच्या मते जागतिक इक्विटी मार्केटमध्ये दुरुस्ती पाहायला मिळाली आहे. 
 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget