मुंबई: देशभरात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वांनाच हैराण केले आहे. पण तुम्हाला काही लिटर पेट्रोल आणि डिझेल मोफत दिले गेले किंवा तुम्हाला कॅशबॅक दिला गेला तर तुम्ही काय म्हणाल? की हे कसं शक्य आहे किंवा कुठल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने याचे वाटप केले जाणार आहे का? तर मंडळी यातली काहीच गोष्ट नाही, पण हे शक्य सुद्धा आहे.
पेट्रोल आणि डिझेल खरेदी करताना तुम्ही फ्युएल क्रेडिट कार्डद्वारे तुमचे पैसे वाचवू शकता. बाजारात अनेक इंधन क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. पण खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी शुक्रवारी इंडियन ऑइल कोटक को-ब्रँडेड इंधन क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली.( Indian Oil and Kotak Mahindra Launches Co Branded Fuel Credit Card)
या टाय-अपमुळे, ग्राहकांना एक चांगले रिवॉर्डस् मिळू शकतात. शिवाय ग्राहकांना इंधनाचा वापर आणि गैर-इंधन आणि वारंवार खर्च करणार्या श्रेणींवर, जसे की रेस्टॉरंट्स आणि किराणा सामानावर चांगले रिवॉर्ड मिळतील असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
आम्ही कोटक महिंद्रा बँकेसोबतच्या सहकार्याबद्दल खूप उत्सुक आहोत, इंडियन ऑइलचा त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य प्रदान करून इंधन भरण्याचा त्यांचा अनुभव रिवॉर्ड पॉइंट्समुळे सुखद राहील असा आम्हाला विश्वास असल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक (रिटेल ट्रान्सफॉर्मेशन) संदीप मक्कर यांनी म्हटलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या: