Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेत रोमॅंटिक वळण आले आहे. आजच्या भागात यश नेहाला डिनरडेटवर घेऊन जाणार आहे. तसेच रोमॅंटिक अंदाजात तो पुन्हा एकदा नेहाला प्रपोज करणार आहे. 


'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा आज विशेष भाग असणार आहे. आजच्या भागात नेहा यशसोबत पहिल्यांदाच डिनरडेटवर जाणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये नेहा आणि यशचे सुंदर रोमॅंटिक क्षण दाखवण्यात आले आहेत. यशने नेहा आणि त्याच्या नात्याविषयी त्याच्या घरी सांगताच सिम्मी काकूंनी यश आणि नेहासाठी खास डिनटडेटचे आयोजन केले आहे. त्यामुळे ही पहिली-वहिली यश-नेहाची डिनरडेट नक्कीच खास असणार आहे.





नेहाने प्रेमाची कबुली दिल्याने आता नेहा-यशच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार आहे. यशच्या रूपाने नेहाच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव होणार आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने 
(Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 


संबंधित बातम्या


Jhund : आमिर खाननं सूचना दिली अन् अमिताभ बच्चन 'झुंड'मध्ये काम करण्यास तयार झाले!


Rang Majha Vegla : लेकीची माफी मागणार राधा आई, होळीत होणार का दीपा-कार्तिकची दिलजमाई?


Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील नव्या ट्विस्टची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha