Holi 2022 : खरंतर 17 आणि 18 मार्च रोजी होळीचा (Holi 2022) सण साजरा होणार आहे. परंतु, होळीचा आनंद आठवडाभर आधीच लोकांवर चढतो. होळीच्या सणाबाबत प्रत्येकजण खूप उत्साही असतो. होळीत रंग खेळण्यात जेवढी मजा येते, तेवढीच समस्या होळीनंतर केसांतून रंग काढण्यातही येते. अशा वेळी काही लोक या भीतीपोटी होळी खेळणे थांबवतात, मात्र होळी न खेळण्याऐवजी काळजीपूर्वक होळी खेळली तर कोणतीच समस्या उद्भवणार नाही. होळीपूर्वी केसांची कोणती काळजी घ्यावी आणि होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण कसे करावे हे जाणून घेऊयात. 


होळीच्या दिवशी केसांचे रंगांपासून संरक्षण कसे करावे?


खोबरेल तेल लावा - होळीमध्ये केसांमध्ये रंग अशा प्रकारे चिकटून राहतात की ते काढल्यानंतरही बाहेर पडत नाहीत. अशा वेळी केस सुरक्षित ठेवण्याचा उपाय म्हणजे डोक्याला खोबरेल तेल चांगले लावणे. जर तुम्ही तुमच्या केसांना चांगल्या प्रमाणात तेल लावले तर ते लेप म्हणून काम करते आणि केसांचे रंगात असलेल्या रसायने आणि इतर घटकांपासून संरक्षण करते. 


केसांना मोहरीचे तेल लावा - सर्वप्रथम केमिकलवर आधारित रंग वापरू नका. त्याऐवजी सेंद्रिय किंवा हर्बल रंग वापरा. होळी हा असा सण आहे की, यावेळी प्रत्येकजण आनंदाने एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करत असतो. त्यामुळे कोण रासायनिक रंग वापरत आहे किंवा कोण केमिकलचे रंग वापरत आहे हे शोधणं कठीण जातं. हे टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे केसांना मोहरीचे तेल लावणे. मोहरीचे तेल कंडिशनिंगचेसुद्धा काम करते.  


केसांना लिंबाचा रस लावा - जर तुमची टाळू कोरडी असेल किंवा तुम्हाला कोंड्याची खूप तक्रार असेल तर तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. खोबरेल तेलात अर्धा चमच लिंबाचा रस घाला. हे मिश्रण केसांना लावा. लिंबूमध्ये असे घटक असतात जे केसांमध्ये साचलेली अशुद्धता काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे हा उपाय फायदेशीर ठरेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha