मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारावर अशा काही कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. तर काही कंपन्या अशाही आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. शेअर बाजारात काही कंपन्या अशा असतात ज्या आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या कित्येक दिवसांपासून चांगले रिटर्न्स मिळवून देत असतात.
गुंतवणूकदारांना तब्बल 53000 टक्क्यांनी रिटर्न्स
सध्या अशाच एका पेनी स्टॉकमध्ये मोडणाऱ्या एका शेअरची चर्चा होत आहे. या शेअरचा आपला असा इतिहास असून त्याने लोकांना जबरदस्त रिटर्न्स दिलेले आहेत. हा शेअर थेट मल्टिबॅगर म्हणून नावारुपाला आला असून त्याने एखा वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 53000 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
गुंतवणूकदार शेअर्स विकण्यास तयार नाहीत
या स्टॉकची सध्या सगळीकडे चर्चा आहे. कारण गेल्या 115 दिवसांपासून या स्टॉकला अपर सर्किट लागत आहेत. लोकांना बम्पर रिटर्न्स देणाऱ्या या शेअरचे नाव Sri Adhikari Brothers Televisn Ntwrk Ltd असे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार या कंपनीचे शेअर्स विकण्यास तयार नाहीत.
सलग लागले अपर सर्किट
हा शेअर शुक्रवारीदेखील दोन टक्क्यांनी वाढून थेट 690.95 रुपयांवर स्थिरावला. या स्टॉकला 03 एप्रिल 2024 ते 13 सप्टेंबर 2024 या काळात सलग 115 अपर सर्किट लागले आहेत. आगामी काळातही या शेअरला अपर सर्किट लागू शकते. कारण या स्टॉकला सध्यातरी कोणीही विकण्यास तयार नाही.
गेल्या काही दिवसांपासून सलग अपर सर्किट लागत असल्यामुळे स्टॉक एक्स्जेंजने त्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. जून 2024 मध्ये या स्टॉकच्या हलचालींवर विशेष लक्ष देण्यात आले होते. सध्यातरी या स्टॉकमध्ये कोणतीही बेकायदेशीर प्रक्रिया वा कृत्य आढळलेले नाही.
शेअर होल्डिंग पॅटर्न काय आहे?
या कंपनीची साधारण 59.52 टक्के मालकी प्रवर्तकांची गुंतणूक आहे. तर 40.26 टक्के शेअर्स सामान्य जनतेकडे आहेत. या कंपनीत परदेशी गुंतवणूकदारांकडे 0 टक्के शेअर्स आहेत. तर 40.26 टक्के शेअर्स हे स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
फक्त 2 ते 3 दिवसांत पैशांचा पाऊस, 'हा' एक स्टॉक तुम्हाला देणार दमदार रिटर्न्स!