Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता  (Mumbai University Senate Election)  22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. 10 जागांवरील निवडणूकीसाठी एकूण 28 उमेदवार असून या निवडणूकीसाठी एकूण 13,406 मतदार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे.


विद्यापीठाच्या https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बुथनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार त्यांच्या नावाने आणि मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे त्यांचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र आणि बुथ क्रमांक पाहू शकतील. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या निवडणूकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. 38 केंद्र आणि 64 बुथसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 


आज मतदार केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले असून पुढील प्रशिक्षण 19 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्वच स्तरातून सहकार्य अपेक्षित असून 25 सप्टेंबर 2024 रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.


युवासेना विरुद्ध अभाविप-


मुंबई  विद्यपीठाच्या निवडणुका  22 सप्टेंबरला होणार आहे. सोमवारी (12 ऑगस्ट)  सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची वेळ होती.  यामध्ये युवासेना आणि अभाविपकडून सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे सिनेट निवडणुकीत सर्व जागांसाठी थेट लढत युवासेना विरुद्ध अभाविप होणार आहे.  याशिवाय मनसेचे सचिव सुधाकर तांबोळी यांनी अर्ज भरला असून छात्र भारती संघटने कडून चार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.  तर अपक्ष म्हणून चार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत


मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उमेदवारांची नावे



  • हर्षद भिडे 

  • प्रतीक नाईक 

  • रोहन ठाकरे 

  • प्रेषित जयवंत 

  • जयेश शेखावत 

  • राजेंद्र सायगावकर 

  • निशा सावरा 

  • राकेश भुजबळ 

  • अजिंक्य जाधव 

  • रेणुका ठाकूर


मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक युवा सेना उमेदवारांची नावे  



  • प्रदीप सावंत

  • मिलिंद साटम

  • परम यादव

  • अल्पेश भोईर

  • किसन सावंत

  • स्नेहा गवळी

  • शीतल शेठ   

  • मयूर पांचाळ  

  • धनराज कोहचडे 

  • शशिकांत झोरे 


तरूणाईचा कौल कुणाच्या बाजूने?


सीनेटच्या निवडणुकीतुन तरूणाईचा कौल कुणाच्या बाजूनं आहे हे स्पष्ट होईल. सिनेट निवडणुकीत जो बाजी मारेल त्या मुंबई महानगरपालिकेत तरूणांचा पाठिंबा मिळेल असं हे समीकरण आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पाहायला मिळाली आहे. पण आता शिंदे, मनसे आणि भाजप हे तिघे एकत्र येत असल्यानं मुंबई महानगरपालिकाही ठाकरेंसाठी सोपी नसणार आहे.