Sovereign Gold Bond Scheme: सोवरेन गोल्ड बाँड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. सध्या 2016-17 साली जारी करण्यात आलेल्या सॉवरेन गोल्ड बाँडच्या सिरिज - IV मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तब्बल 150 टक्क्यांनी रिटर्न्स मिळत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) 2016-17 सालच्या 17 मार्च 2017 रोजी जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बाँड सीरीज IV च्या (SGB 2016-17 Series IV)  प्रीमॅच्यूअर रिडम्पशन प्राईसची (Premature Redemption Price) घोषणा केली आहे. या सिरीजसाठी आरबीआयने या सिरीजच्या सॉवरेन गोल्ड बाँडसाठी  रिडम्पशन प्राइस 7196 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे.


म्हणजेच 17 मार्च 2017 सॉवरेन गोल्ड बाँड सीरीज -IV मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी तेव्हा 2893 रुपये प्रति ग्रॅम या हिशोबाने गोल्ड बाँडची खरेदी केली होती. आता याच गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर तब्बल 149 टक्क्यांनी रिटर्न्स मिळत आहेत.


आरबीआयने नेमका काय निर्णय घेताला आहे?  


बँकिंग सेक्टर रेग्यूलेटर भारतीय रिझर्व्ह बँकेने 13 सप्टेंबर 2024 रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून प्रिमॅच्यूअर रिडम्प्शनबद्दल माहिती दिली आहे.  या माहितीनुसार 17 मार्च 2017 रोजी 2016-17 सालासाठी सिरीज 4 चे सॉवरेन गोल्ड बाँड जारी करण्यात आले होते. आरबीआयने सांगितल्यानुसार सॉवरेन गोल्ड बाँड जारी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांनांतर  ज्या तारखेपासून व्याज दिले जाते, त्या तारखेपासून गुंतवणूकदारांना प्रिमॅच्यूअर रिडम्प्शनची परवानगी दिली जाते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार सोमवारी म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 रोजी या सिरीजच्या सॉवरेन गोल्ड बाँडचे प्रिमॅच्यूअर रिडम्प्शन होईल. 


रिडम्प्शन प्राईज कशी ठरवली? 


या गोल्ड बाँड सिरीजसाठी आरबीआयने रिडम्प्शन प्राईज ठरवाताना नियमांचे पालन केले आहे. नियमानुसार आरबीआयने सॉवरेन गोल्ड बाँडची रिडम्प्शन प्राईज ही गोल्ड बाँड रिडम्प्शनच्या तारखेच्या अगोदरच्या आठवड्याच्या पाच दिवसांना विचारात घेतले जाते. म्हणजेच यावेळी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत 999 शुद्धता असलेल्या सोन्याची क्लोजिंग प्राईज लक्षात घेऊन रिडम्प्शन प्राईज ठरवण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार य कालावधीतील सोन्याची क्लोजिंग प्राईज इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने ( India Bullion and Jewellers Association Ltd)  पब्लिश केलेली आहे. म्हणजेच 9 सप्टेंबरपासून ते 13 सप्टेंबर 2024 या काळातील प्रत्येक दिवसाच्या सोन्याच्या क्लोजिंग प्राईजची सरासरी काढून सॉवरेन गोल्ड बाँड सिरीज -4 ची रिडम्प्शन प्राईज ठरवण्यात आली आहे. ही रिडम्प्शन प्राईज 7196 रुपये प्रति ग्रँम निश्चित करण्यात आली आहे. 


गुंतवणूकदारांना यावेळी जास्त फायदा 


या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2024-25 सालासाठीच्या अर्थसंकल्पात सोन्यावर सीमाशुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आले होते. परिणामी सोन्याचा भाव कमी झाला होता. ऑगस्ट महिन्यात सॉवरेन गोल्ड बाँडच्या रिडम्प्शनची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी गुंतवणूकदारांना कमी रिटर्न्स मिळाले होते. मात्र यावेळी सॉवरेन गोल्ड बाँडच्या सिरीज 4 मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तुलनेत चांगले रिटर्न्स मिळत आहेत. 


हेही वाचा :


सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या एका तोळं सोन्यासाठी किती हजार मोजावे लागणार?