एक्स्प्लोर

Bank Strike : बँकांचे कर्मचारी सलग तीन दिवस संपावर, संपाची प्रमुख कारणं कोणती? बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय?

Bank Strike : सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या तीन दिवसांमध्ये बँकांचं कामकाज बँक कर्मचारी यूनियननं पुकारलेल्या संपामुळं बंद राहणार आहे. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

Bank strike Update नवी दिल्ली : बँक कर्मचारी यूनियनकडून 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. सलग पाच दिवस बँका बंद राहू नये, ग्राहकांना संपाचा फटका बसू नये यासाठी रविवारी देखील बँका सुरु ठेवण्यात आल्या होत्या. सप्टेंबरमधील चौथ्या शनिवार मुळं बँका काल बंद होत्या. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी बँकाचं कामकाज सुरु ठेवण्यात आलं होतं. आता उद्यापासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यानं चेक क्लिअरन्स, बँक खात्यातून रोख रक्कम काढणे आणि जमा करणे यासह इतर बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात. बँक कर्मचारी यूनियनच्या संपाचा परिणाम सार्वजनिक बँका, जुन्या खासगी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये पाहायला मिळू शकतो. 

बँकांचं कामकाज बंद असलं तरी या कालावधीत डिजीटल बँकिंग आणि इतर ऑनलाइन सेवा नेहमीप्रमाणं सुरु राहतील. विशेष म्हणजे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एक्सिस बँक या सारख्या खासगी बँकांच्या शाखा या संप कालावधीत सुरु असतील. बँक कर्मचाऱ्यांकडून 11 सप्टेंबरला देखील देशव्यापी संप करण्यात आला होता. सार्वजनिक क्षेत्रातील बुहतांश बँकांनी त्यांच्या ग्राहकांना विविध पर्यायांचा वापर करत  संपामुळं होणाऱ्या अडचणीची माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं संप कालावधीत ग्राहकांना बँकेच्या शाखा आणि कार्यालयात आवश्यक त्या सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सांगितलं आहे. मात्र, संप काळात काही सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. रोख रक्कम काढायची असेल तर एटीएमचा आणि पैसे जमा करायचे असल्यास  CDM चा वापर करावा, इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि इतर डिजीटल पर्यायांचा वापर करावा, असं देखील आवाहन एसबीआयकडून करण्यात आलं आहे. 

यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स या बँक कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या सात संघटनांच्या केंद्रीय संघटनेकडून संपाचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून मागण्या मान्य न झाल्यास 26 ऑक्टोबरपासून अनिश्चितकालीन संपावर जाऊ असा इशारा देखील यूएफबीयूनं दिला आहे. संपावर जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही आहे. यूनियनच्या नेत्यांच्या माहितीनुसार मुख्य श्रम आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत सरकारकडून पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यावर ठोस आश्वासन दिलं नाही.  

एआयबीओसीचे महासचिव रुपम रॉय यांनी सरकार आणि व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळं यूनियनला आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास भाग पडलं, असं म्हटलं. काही सरकारी आणि वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची पद्धत लागू आहे. एनसीबीईचे महासचिव एल चंद्रशेखर यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये, आरबीआय, एलआयसी, जीआयसी, नाबार्ड या सारख्या इतर संस्थांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरु आहे. शेअर बाजार, चलन बाजार आणि विदेशी चलन बाजारात देखील आठवड्यात पाच दिवस काम चालतं, असं म्हटलं.पेन्शनच्या लाभातील सुधारणा, सर्व पेन्शनधारकांना एक समान महागाई भत्ता धोरण, एनपीएसमधील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत परतण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्याव्यात या देखील बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. वित्त मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारु नये असं म्हटलं आहे. चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे. पीएलआय योजना दीर्घ चर्चेनंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच मागं घेतली गेली असल्याचं देखील वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.  

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
Narendra Modi : 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
Advertisement

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget