Bank : दसरा आणि दिवाळीपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेनं एफडी आणि विशेष योजनांवरील व्याजदरात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसोबत ज्येष्ठ नागरिकांनाही वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे.


मुदत ठेवींवरील व्याजदरात 1.25 टक्क्यांची वाढ


दुर्गापूजा आणि दिवाळीपूर्वीच्या या सणासुदीच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. मुदत ठेवींवरील व्याजदरात 1.25 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे नवे दर आजपासून म्हणजेच 12 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. याचा फायदा बँक ऑफ महाराष्ट्रच्या लाखो ग्राहकांना होणार असल्याचे बोलले जात आहे. हा लाभ सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणार आहे. अशा स्थितीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


46 ते 90 दिवस बँकेत पैसे जमा केल्यास 1.25 टक्के वाढीसह व्याज मिळणार


व्याजदरातील वाढ FD तसेच विशेष योजनांवर लागू होणार असल्याची माहिती बँक ऑफ महाराष्ट्रने दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, जर ग्राहकांनी 46 ते 90 दिवस बँकेत पैसे जमा केले तर त्यांना 1.25 टक्के वाढीसह व्याज मिळेल. यामुळं सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यावसायिकांमध्येही मोठी आनंदाची लाट आहे. 


हा दर विशेष योजनांवरही लागू 


सणासुदीच्या काळात तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला चांगली संधी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बँकेचे म्हणणे आहे की, व्याजदरातील वाढ बँकेने ठरवलेल्या कालावधीनुसारच लागू होईल. ही वाढ FD तसेच विशेष योजनांना लागू होईल.


विशेष योजनांवर 7.5 टक्क्यांचा आकर्षक व्याजदर 


बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षाच्या मुदतीच्या FD वर 6.50 टक्के दराने व्याज मिळेल. तर ग्राहकांना एका वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या ठेव योजनांवर लागू होणाऱ्या व्याजदरात 25 bps ची वाढ मिळेल. याचा अर्थ ग्राहकांना ठेव योजनेवर 6.25 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या म्हणण्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांना FD वर 0.5 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 200 ते 400 दिवसांसाठी विशेष योजनांवर 7.5 टक्के दरानं आकर्षक व्याज दिले जाईल. विशेष बाब म्हणजे बँकेचे हे आकर्षक व्याजदर अल्पकालीन आणि दीर्घकालीन बचत करणार्‍यांसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Personal Finance : PPF, म्युच्यअल फंड किंवा FD मध्ये गुंतवणुक करताय? किती दिवसात दुप्पट नफा मिळेल, समीकरण जाणून घ्या