Global Hunger Index 2023: आज ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) जारी करण्यात आला आहे. यामध्ये भारताची 111 व्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताचा  स्कोअर हा 28.7 टक्के आहे. यावेळी भारताची पाकिस्तानसह बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेनं बगल काढली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारतात भूक आणि उपासमारीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.


भारताची 111 व्या स्थानावर घसरण


ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताची स्थिती बिकट झाली आहे. 125 देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 111 व्या स्थानावर आला आहे. इतकेच नाही तर सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे प्रमाण तसेच बालकांच्या कुपोषणातही भारत आघाडीवर आहे. 2022 सालापासून भारताची स्थिती आणखी बिकट झाली आहे. गेल्या वर्षी भारत या निर्देशांकात 107 व्या क्रमांकावर होता. यावर्षी त्यामध्ये आणखी घसरण झाली असून, भारताची  111 व्या स्थानावर घसरण झाली आहे.  


ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा स्कोर खूपच कमी


आज जाहीर झालेल्या या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा स्कोअर 28.7 टक्के आहे. यानुसार भारतात भूक आणि उपासमारीची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) हे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूकेचे सर्वसमावेशक मोजमाप आणि मागोवा घेण्यासाठी एक साधन आहे.


पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळही भारताच्या पुढे 


ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार, भारताच्या शेजारी असणाऱ्या  इतर देशांवर नजर टाकली तर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळचीही स्थिती चांगली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये पाकिस्तान 102 व्या, बांगलादेश 81 व्या, नेपाळ 69 व्या आणि श्रीलंका 60 व्या क्रमांकावर आहे.


गेल्या वर्षी केंद्र सरकारने ग्लोबल हंगर इंडेक्स नाकारला होता


केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने गेल्या वर्षी आणि त्याआधीच्या वर्षी म्हणजे सलग दोन वर्षे हा ग्लोबल हंगर इंडेक्स अहवाल पूर्णपणे नाकारला होता. मंत्रालयानं सांगितलेल्या माहितीनुसार, जागतिक भूक मोजण्यासाठी केवळ मुलांवर लक्ष केंद्रित केलेल्या मेट्रिक्सचा वापर केला जाऊ नये. मंत्रालयाने याला भूक मोजण्याचा चुकीचा मार्ग म्हटले होते. GHI 2022 बद्दल, मंत्रालयाने असेही म्हटले आहे की भूक मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या 4 पद्धतींपैकी 3 फक्त मुलांच्या आरोग्यावर आधारित आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची 107 व्या स्थानी घसरण, पाकिस्तान-बांग्लादेशही भारताच्या पुढे