Bank Holidays List : मार्च महिना हा सणांनी भरलेला असतो, त्यामुळे जर तुमचा बँकेत जाण्याचा विचार असेल, तर त्याआधी तुम्ही सुट्ट्यांची यादी (March Bank Holiday 2022) नक्की तपासा. कारण पुढच्या आठवड्यात सलग चार दिवस बॅंका बंद राहणार आहेत. होळीमुळे चार दिवस बँकांना बंद असणार आहेत. कोणत्या दिवशी कोणत्या शहरातील बँका बंद राहतील ते जाणून घ्या. 


RBI च्या परिपत्रकारनुसार सुट्टयांची यादी :


बँकिंग सुट्ट्यांची ही यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) परिपत्रकानुसार जारी करण्यात आली आहे. RBI वर्षाच्या सुरुवातीला बँकिंग सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. यामध्ये राज्यानुसार सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. 


कोणत्या शहरात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील ते जाणून घ्या :


17 मार्च - (होलिका दहन) - देहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांचीमधील बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. होलिका दहन असल्यामुळे बॅंका बंद असतील. 
18 मार्च - (होळी / धुलेती / डोल जत्रा) - बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता, मुंबई आणि तिरुअनंतपुरम वगळता बँका बंद राहतील. होळीच्या सुट्टीनिमित्त बॅंका बंद राहतील. 
19 मार्च - (होळी / याओसांगचा दुसरा दिवस) - भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथील बँका होळीनिमित्त बंद राहतील. 
20 मार्च - रविवार (साप्ताहिक सुट्टी) मुळे सर्व शहरातील बँका बंद राहतील. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha