Bank Holidays in March 2022 :  नवीन वर्षाचा तिसरा महिना म्हणजेच मार्च महिना तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत, केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) मार्च 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बॅंकेत जाण्यापूर्वी एकदा ही सुट्ट्यांची यादी निश्चित तपासा. आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, मार्च महिन्यात (March 2022 Bank Holiday) एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार, मार्च 2022 मध्ये बँकांमध्ये एकूण 13 दिवस सुट्टी असेल. यामध्ये चार रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असणार आहे. याशिवाय 1 मार्चला महाशिवरात्री, 17 मार्चला होलिका दहन आणि 18 मार्चला होळीची सुट्टी असणार आहे. 


अशा वेळी, तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जा. अन्यथा तुम्हाला नंतर त्रासाला सामोरे जावे लागेल. याशिवाय बँकेचे कोणतेही महत्त्वाचे काम सुट्टीपूर्वी करा. ही बँक सुट्ट्यांची यादी आरबीआयने (RBI) त्यांच्या वेबसाईटवर शेअर केली आहे. बँकांमधील या सुट्ट्या संपूर्ण देशासाठी आहे हे लक्षात घ्या. 


मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी :


1 मार्च - चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, भोपाळ, भुवनेश्वर, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, कोची - या राज्यांत महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri 2022) सुट्टी  आहे. 


3 मार्च - गंगटोकमध्ये लोसारची सुट्टी असेल.
4 मार्च - आयझॉलमधील छपचार कुटमुळे बँका बंद राहतील.
6 मार्च - रविवारची सुट्टी.
12 मार्च - दुसरा शनिवार सुट्टी.
13 मार्च - रविवारची सुट्टी.
17 मार्च - देहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांचीमध्ये होलिका दहनाच्या दिवशी बँका बंद राहतील.
18 मार्च - चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, भोपाळ, भुवनेश्वर, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, कोची, लखनऊ येथे होळीची सुट्टी असणार आहे. 
19 मार्च - भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे होळी निमित्ताने बँका बंद राहतील.
20 मार्च - रविवारची सुट्टी
22 मार्च - बिहारच्या दिनानिमित्ताने बॅंका बंद राहतील.


26 मार्च - चौथ्या शनिवारची सुट्टी पाटण्यात बँका बंद राहतील.
27 मार्च - रविवारची सुट्टी.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha