7 years of Atal Pension Yojana : केंद्र सरकारने सुरु केलेली अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सरकारने सुरु केलेल्या सार्वजनिक सुरक्षा योजनांमुळे सामान्य माणसाला विमा आणि पेन्शन मिळणे सहज शक्य झाले आहे. याच अटल पेन्शन योजनेची आता सात वर्ष पूर्ण झाली आहेत.
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी सुरू केली होती. या योजना लोकांना परवडणाऱ्या दरात विमा आणि सामाजिक सुरक्षा देण्याबरोबरच निवृत्ती वेतन देण्यात यशस्वी ठरल्या आहेत. अटल पेन्शन योजनेबरोबरच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनांनाही 7 वर्ष पूर्ण झाली आहेत.
अटल पेन्शन योजना (APY) :
- ही योजना 9 मे 2015 रोजी गरीब, समाजातील निम्न घटक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसह सर्व भारतीयांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्रणाली म्हणून सुरू करण्यात आली.
- ही योजना 1 जून 2015 पासून कार्यरत आहे आणि PFRD द्वारे प्रशासित आहे.
- या योजनेअंतर्गत, 18-40 वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात. ज्यांचे बचत खाते कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे.
- या योजनेअंतर्गत पाच पेन्शन स्लॅब आहेत. एक हजार रुपये, दोन हजार रुपये, तीन हजार रुपये, चार हजार रुपये आणि पाच हजार रुपये. जेव्हा ग्राहक 60 वर्षांचा होतो, तेव्हा सरकार त्याला निवडलेल्या पेन्शन स्लॅब नुसार पेन्शन देते. ग्राहकांच्या मृत्यूनंतर, नामांकित व्यक्तीला पेन्शन दिली जाते.
- या योजनेत तुम्हाला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.
गुंतवणुकीची रक्कम ग्राहकांच्या वयावर अवलंबून असते, म्हणजेच तुम्ही तरुण वयात योजनेत भाग घेतल्यास, तुम्ही अल्प रकमेमध्ये पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन सुनिश्चित करू शकता. हे अशा प्रकारे समजले जाऊ शकते की जर तुम्ही वयाच्या18 व्या वर्षी या योजनेचा भाग झालात तर तुम्हाला 42 रूपये महिन्याला गुंतवून वर्षांमध्ये रु. 105840 योगदान द्यावे लागेल. 40 वर्षे वयाच्या योजनेत रु. 348960 (1454) मासिक योगदान द्यावे लागेल.
आजपर्यंत APY योजनेअंतर्गत 4 कोटींहून अधिक ग्राहकांची नोंदणी झाली आहे. एकूण पेन्शन मालमत्ता 20,922 कोटी रुपये आहे, जी वार्षिक 33.37 टक्क्यांनी वाढली आहे. प्रीमियम मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही भरला जाऊ शकतो. योगदानाची रक्कम निवडलेल्या पेन्शनच्या रकमेवर आणि व्यक्तीच्या वयाच्या आधारे निर्धारित केली जाईल. 18 ते 40 वयोगटातील वैध बचत खातेधारक या योजनेसाठी स्वत:ची नोंदणी करू शकतात.
महत्वाच्या बातम्या :