(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashwin Dani : एशियन पेंट्सचे संस्थापक अश्विन दाणी यांचं निधन, सर्वात मोठी कंपनी करण्यात दाणी यांचं मोलाचं योगदान
देशातील सर्वात मोठी पेंट्स उत्पादक कंपनी असलेल्या एशियन पेंट्सचे सह-संस्थापक अश्विन दाणी यांचं निधन (Ashwin Dani passes away) झालं आहे.
Ashwin Dani passes away: देशातील सर्वात मोठी पेंट्स उत्पादक कंपनी असलेल्या एशियन पेंट्सचे सह-संस्थापक अश्विन दाणी यांचं निधन (Ashwin Dani passes away) झालं आहे. वयाच्या 79 वर्षी दाणी यांनी अखेरचा श्वास घेतला. पेंट्स उत्पादनात देशातील सर्वात मोठी कंपनी करण्यात दाणी यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतेय.
अश्विन दाणी यांचा एशियन पेंट्समधील प्रवास हा 1968 मध्ये सुरु झाला होता. त्यानंतरच्या वर्षांत त्यांनी कंपनीचे नेतृत्वही केले. एशियन पेंट्स ही आज भारतातील सर्वात मोठी पेंट्स कंपनी आहे. त्यात अश्विन दानी यांचे मोठे योगदान मानले जाते. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये अश्विन धनी यांची एकूण संपत्ती $7.1 अब्ज होती.
मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी
अश्विन दाणी यांचा जन्म 26 सप्टेंबर 1944 रोजी मुंबईत झाला होता. 1966 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी मिळवली. त्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी अक्रॉन विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. डेट्रॉईटमध्ये त्यांनी केमिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. 1968 मध्ये, त्यांनी एशियन पेंट्स या त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला.
2022-23 मध्ये एशियन पेंट्सचा महसूल 34 हजार 488 कोटी
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, एशियन पेंट्सचा महसूल 34 हजार 488 कोटी रुपये होता. ज्यामध्ये कंपनीचा निव्वळ नफा हा 4 हजार 101 कोटी रुपये होता. आजमितीस, एशियन पेंट्सचे बाजार भांडवल 303341 कोटी रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात एशियन पेंट्सचा शेअर 4.21 टक्क्यांच्या घसरणीसह 3162 रुपयांवर व्यवहार करत आहे. अश्विन दाणी यांनी एशियन पेंट्ला नवीन उंचीवर नेऊन ठेवले. काही दशकातच कंपनीने मोठा पल्ला गाठला. नावाप्रमाणे कंपनीने एशियन बाजारातच नाही तर जागतिक बाजारात दबदबा तयार केला.
अश्विन दाणी यांचे वडील आणि इतर तिघांनी मिळून स्वातंत्र्यपूर्व काळात, 1942 साली एशियन पेंटची स्थापना केली होती. एशियन पेंट केवळ भारताचीच नाही तर आशियातील मोठी रंग कंपनी ठरली आहे. अश्विन दाणी यांना लहानपणापासूनच रंगांचे वेड होते. त्यांचे आयुष्यभर रंगावर प्रयोग सुरु होते. रंगावर विशेष प्रेम असल्याने त्यांनी याच क्षेत्राचे शिक्षण घेतले होते. दरम्यान, अश्विन दाणी यांच्या निधनाची वार्ता धडकताच शेअर बाजारात एशियन पेंटच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या:
Crude Oil Price Hike : घर रंगवणं महागणार! कच्च्या तेलाच्या महागाईमुळे पेंट निर्मात्यांना झटका, इंडिगो पेंट्सचे शेअर 11 टक्क्यांनी घसरले