Akshaya Tritiya 2022 : आज 3 मे रोजी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2022) आणि ईद (Eid 2022) सोबतच हा सणही देशभरात साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या विशेष मुहूर्तावर लोक या दिवशी सोने खरेदी करतात ही वर्षानुवर्षे परंपरा आहे. सोने खरेदी केल्याने घरात संपत्ती येते. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून साजरी केली जाते. या दिवशी लोक सोने खरेदी करतात


बाजारात खऱ्यासोबतच बनावट सोनंही
सध्या बाजारात खऱ्यासोबतच बनावट सोनंही मोठ्या प्रमाणात मिळू लागलं आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सोने खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास बनावट सोने खरेदी करणे टाळता येते. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला सोन्याची शुद्धता तपासण्‍याच्‍या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या, खरे किंवा खोटे सोने कसे तपासाल?


सोने खरेदी करताना हॉलमार्कची काळजी घ्या
सोने खरेदी करताना त्याच्या हॉलमार्किंगकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांना सरकारकडून सोने खरेदी करताना BIS चे हॉलमार्क पाहण्याचा सल्ला दिला जातो. यावरून हे सोने खरे की बनावट हे कळते. परंतु, हॉलमार्क खरा आहे की खोटा हे ओळखण्यासाठी, तुम्ही हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी चिन्ह तपासा.


BTS अॅपद्वारे खरे सोने ओळखा
बीआयएसच्या बीआयएस केअर अॅपवरून तुम्ही खरे आणि बनावट सोने देखील ओळखू शकता. हे अॅप खास खऱ्या आणि बनावट वस्तूंच्या ओळखीसाठी (खरी किंवा बनावट सोन्याची चाचणी) तयार करण्यात आले आहे. अॅपद्वारे तुम्ही ISI मार्क आणि हॉलमार्किंग देखील सहज ओळखू शकता. तुम्ही खरेदी केलेला माल किंवा सोने बनावट असल्याचे या अॅपवर तपासल्यानंतर तुम्हाला कळले, तर तुम्ही या अॅपद्वारे त्याबाबत तक्रारही करू शकता.


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 


महत्वाच्या बातम्या :