Share Market Updates : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.  भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर 600  अंकानी सेन्सेक्स घसरला. अमेरिकन शेअर बाजारातही घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. 


शेअर बाजार सुरू झाला तेव्हा एक टक्क्यांहून अधिक घसरण सेन्सेक्समध्ये झाली. निफ्टीमध्ये 178 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांक 16,924.45 अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेक्स 56,429.45 अंकावर सुरू झाला. आज निफ्टीमधील 50 पैकी 4 शेअर्स वधारले आहेत. तर, 46 शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीमध्ये 115 अंकानी घसरत 35973 अंकावर व्यवहार करत होता. बँक निफ्टी निर्देशांक 36000 अंकाखाली घसरला आहे. प्री-ओपनिंग सत्रात  घसरलेला सेन्सेक्स सकाळी 9.30 वाजल्यानंतर काही प्रमाणात सावरला असल्याचे चित्र होते. मात्र, बाजारात विक्रीचा दबाब असल्याचे स्पष्ट चित्र आहे. 


याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 460 अंकांनी घसरून 57,061 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 143 अंकांच्या घसरणीसह 17,102 अंकांवर बंद झाला. 


आज शेअर बाजारात इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 4.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, अॅक्सिक बँकेच्या शेअर दरात 1.02 टक्क्यांनी वाढ झाली. टाटा मोटर्समध्ये 0.59 टक्के आणि डिव्हीज लॅबच्या शेअरमध्ये 0.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


टायटनच्या शेअर दरात 1.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. बजाज ऑटोच्या शेअर दरात 1.65 टक्के, एशियन पेंट्समध्ये 1.58 टक्क्यांची घसरण दिसून आली. सन फार्मामध्येदेखील 1.56 टक्क्यांची घट झाली आहे. 


शेअर बाजारावर कोरोनाचे सावट?


चीनसह जगभरात कोरोना महासाथीची लाट येत असल्याचे चित्र आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. भारतासह जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती आहे. अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली. डाउ जोन्स शुक्रवारी जवळपास 900 अंकानी घसरला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: