एक्स्प्लोर

Akash Ambani Shloka Ambani: अंबानी कुटुंबात छोट्या परीचे आगमन; आकाश आणि श्लोकाला कन्यारत्नाचा लाभ

Akash Ambani and Shloka Mehta Ambani: आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी हे दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. आज, या दाम्पत्याला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.

Akash Ambani and Shloka Mehta Ambani Second Child:   आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. श्लोका (Shloka Mehta) आणि आकाश अंबानी (Akash Ambani) हे दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. श्लोका अंबानी यांनी आज एका मुलीला जन्म (Baby Girl) दिला आहे. आकाश आणि श्लोका यांना याआधी पृथ्वी हा मुलगा आहे. 

काही दिवसांपूर्वी नीता मुकेश अंबानी यांच्या नावावर असलेल्या सांस्कृतिक केंद्राच्या (NMACC) उद्घाटन सोहळ्यादरम्यान, काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यामध्ये श्लोका अंबानीचा बेबी बंप दिसत होता. यानंतर ती पुन्हा आई होणार असल्याची बातमी चर्चेत आली होती. आता तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला आहे.

2019 मध्ये विवाहबद्ध 

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह मार्च 2019 मध्ये झाला होता. श्लोका आणि आकाश हे बालपणीचे मित्र आहेत. दिग्गज हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका एका वर्षानंतर आई झाली. 10 डिसेंबर 2020 रोजी, श्लोकाने एका मुलाला जन्म दिला होता. पृथ्वीचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. या फोटोत आजोबा मुकेश अंबानी आणि  नातू पृथ्वीचे बाँडिंग दिसून येते. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या आनंद ओसंडून वाहत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा राधिका मर्चंटसोबत झाला होता. तर, मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिनेही जुळ्या मुलांना जन्म दिला होता. कृष्णा आणि आदिया असे नामकरण करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा अँटिलियामध्ये एका छोट्या परीचे आगमन झाले आहे. 

सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा प्रमुख आहे. आकाशने पहिल्यांदा जिओ इन्फोकॉममध्ये स्ट्रॅटेजी चीफ म्हणून काम करायला सुरुवात केली. Jio ला खूप उंचीवर नेण्यात आकाश अंबानीचा महत्वाचा वाटा आहे.

मुलांवर सोपवली जबाबदारी

मुकेश अंबानी यांनी तिन्ही मुलांवर आपल्या रिलायन्स इंडस्ट्रीतील महत्त्वाच्या कंपन्यांची मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाश अंबानी टेलिकॉम कंपनी जिओची जबाबदारी आहे. तर, रिटेल व्यवसायाची जबाबदारी मुलगी ईशा अंबानीच्या खांद्यावर आहे. धाकटा मुलगा अनंत अंबानी रिलायन्सच्या  नवीकरणीय ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
Bank Holiday: जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget