Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी आज आठवड्यातील पहिला दिवस ऐतिहासिक ठरला आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आजच्या दिवसाच्या व्यवहारात विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स आज पहिल्यांदाच 62700 आणि निफ्टी 18614 वर पोहोचला. शेअर बाजाराने जा जबरदस्त तेजी दाखवली. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 62,504 अंकांवर 211 अंकांच्या उसळीसह प्रथमच 62,500 च्या वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18,614 या विक्रमी उच्चांकी पातळीवर जाऊन 50 अंकांच्या वाढीसह 18,562.7 वर बंद झाला.
शेअर बाजारात आज आयटी, धातू, मीडिया, उपभोग आणि टिकाऊ वस्तू क्षेत्राच्या समभागांची विक्री झाली. तर बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटीज आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्येही तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 वाढीसह आणि 15 घसणीसह बंद झाले. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 समभागांपैकी 27 समभाग घसरणीत बंद झाले आहेत, तर 23 समभाग तेजीत होते.
वधारलेले शेअर्स
आज मार्केट कॅपच्या बाबतीत भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली आहे. रिलायन्सचे शेअर्स 3.40 टक्के, नेस्ले 1.41 टक्के, एशियन पेंट्स 1.38 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.03 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.67टक्के, अॅक्सिस बँक 0.59टक्के, इंडसइंड बँक 0.58 टक्के, अल्ट्रा 40 टक्के आणि एनटीपीसी 0.41 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
घसरलेले शेअर्स
टाटा स्टील 1.18 टक्के, एचडीएफसी बँक 1.06 टक्के, भारती एअरटेल 1.04 टक्के , एचसीएल टेक 0.79 टक्के, एचडीएफसी 0.78 टक्के, इन्फोसिस 0.66 टक्के, मारुती सुझुकी 0.50 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.5 टक्के, 0.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
दरम्यान, आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 277.29 अंकांच्या घसरणीसह 62,016.35 अंकांवर खुला झाला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82.20 अंकांच्या घसरणीसह 18,430.55 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर काही वेळेतच खरेदीचा जोर वाढू लागला. तो बाजार बंद होताना एतिहासाकी वाढीसह बंद झाला.
महत्वच्या बातम्या