Viral Video : आपल्या हृदयाला स्पर्श करणारे अनेक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) येतात. ते पाहून अनेकवेळा आपण हसतो, तर अनेक वेळा आश्चर्यचकित होतो, पण जेव्हा कधी आईशी संबंधित व्हिडीओ येतो, तेव्हा तो आपल्याला भावूक करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर नेटकरीही भावूक झाले आहेत. पण ते तुम्हाला नक्कीच भावूक करेल.


जगात आईपेक्षा मोठा योद्धा कोणीही नाही
आई हा फक्त एक शब्द नसून संपूर्ण जग आहे. आईशिवाय आयुष्याची कल्पनाही येत नाही. आई नसती तर आपलं अस्तित्वच नसतं. मूल या जगात आल्यावर सगळ्यात जास्त आनंद फक्त आईलाच मिळतो. इतका आनंद की जणू तिला जगातील सर्वात मौल्यवान आणि अमूल्य वस्तू मिळाली आहे. ती आनंद आयुष्यभर टिकवून ठेवते. ते म्हणतात ना, की या जगात आईपेक्षा मोठा योद्धा कोणीही नाही. ही केवळ एक म्हण नाही, तर एक सत्य आहे. आई ही आईच असते, मग ती कोणीही असो. मनुष्य किंवा इतर प्राणी. मुलांच्या भल्यासाठी ती काहीही करू शकते. अलीकडेच हे सत्य सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुमचा दिवस नक्कीच आनंददायी जाईल.


 


 






सोशल मीडियावर व्हायरल


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महिला भर पावसात लेकीला आपल्या खांद्यावर बसवून आपल्या मुलाचे संरक्षण करत आहे. यादरम्यान तिने आपली छत्री देखील अशा प्रकारे ठेवली आहे की, तिचे मूल भिजू नये. पावसात भिजलेली ती आई आपल्या मुलीचे पूर्णपणे संरक्षण करत आहे. हा व्हिडीओ 17 सेकंदाचा आहे. पण या व्हिडीओने लोकांना एक मोलाचा संदेश दिला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर (@Gulzar_sahab) नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. त्यामुळेच अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.


 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bride Groom Video : नवरदेवाने भरमंडपात केली नवरीची मस्करी, पुढे काय झालं तुम्हीच पाहा; व्हिडीओ होतोय व्हायरल