Personal Loan Lowest Interest Rate : अनेक जण वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन (Personal Loan) घेतात. वैयक्तिक कर्जामुळे लोकांच्या अनेक छोट्या-मोठ्या आर्थिक गरजा भागवते. अनेक बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) कोणत्याही सुरक्षिततेशिवाय लोकांना वैयक्तिक कर्ज देतात. तुम्ही ऑनलाइन पर्सनल लोन देखील घेऊ शकता. यामध्ये तुमच्या खात्यात घरबसल्या पैसे जमा होतात. मात्र ऑनलाईन कर्ज घेताना तुमच्यासोबत फसवणूक होण्याचाही धोका असतो, त्यामुळे अशावेळी काळजी घेणं आवश्यक आहे. वैयक्तिक कर्ज अधिक जोखमीचे असल्याने त्यावर अधिक व्याज आकारलं जातं. त्यातच, आरबीआयकडून रेपो दरात वाढ केल्यानंतर कर्जावरील व्याज दरातही आणखी वाढ झाली आहे.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर येथे तुम्हाला काही बँकांच्या वैयक्तिक कर्जाविषयी माहिती आ. या बँका तुम्हाला अत्यंत कमी व्याज दरात (Personal Loan Interest rate) कर्ज देत आहेत. तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि पात्रतेनुसार कर्जाची रक्कम ठरवली जाईल. कोणती बँक, किती व्याज दरावर, किती रक्कम कर्ज म्हणून देत आहे हे सविस्तक वाचा.
कोणत्या बँका स्वस्त व्याजावर कर्ज देत आहेत
- बँक ऑफ महाराष्ट्र ( Bank of Maharashtra ) 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.90 टक्क्यांहून अधिक व्याज आकारत आहे.
- बँक ऑफ इंडिया ( Bank of India ) 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज देत आहे, ज्यावर 9.75 टक्के ते 14.25 टक्के व्याज आकारले जाईल.
- पंजाब नॅशनल बँक ( Punjab National Bank ) महिन्यांच्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे, ज्यावर 9.80 टक्के ते 16.35 टक्के व्याज आकारले जाईल.
- करूर वैश्य बँक ( Karur Vysya Bank ) 12 ते 60 महिन्यांसाठी 10 लाखांच्या कर्जासाठी 9.85 टक्के ते 12.85 टक्के व्याज आकारेल.
- आयडीबीआय बँक ( IDBI Bank ) 25 हजार किंवा त्याहून अधिक आणि 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर 12 ते 60 महिन्यांसाठी 9.90 ते 15.50 टक्के व्याज आकारेल.
वैयक्तिक कर्जावरील शुल्क ( Personal Loan Charges )
वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बहुतांश बँका विविध प्रकारचे शुल्क आकारतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI - State Bank of India ) बँकेकडून कर्जाच्या रकमेच्या 0.50 ते 1 टक्के प्रक्रिया शुल्क आकरलं जातं. पंजाब नॅशनल बँक ( PNB - Punjab National Bank ) एक टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवज शुल्क आकारत. त्याचप्रमाणे इतर बँका देखील वैयक्तिक कर्ज शुल्क आकारतात. या व्यतिरिक्त, जर तुमचा वैयक्तिक कर्जाचा EMI मधल्या काळात चुकला तर तुम्हाला दंड भरावा लागेल, जो सर्व बँकांकडून वेगळ्या पद्धतीने आकारला जातो.