AWL Share Price:  आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत असलेलेल गौतम अदानी यांच्या मालकीच्या एफएफसीजी कंपनीने आज शेअर बाजारात उच्चांक गाठला आहे. अदानी विल्मर  (Adani Wilmar)स्टॉकने  गुंतणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला आहे. अवघ्या दीड महिन्यात या स्टॉकची किंमत दुप्पट झाली आहे.  रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा या स्टॉकला झाला असल्याचे म्हटले जात आहे. 


अदानी समुहातील Adani Wilmar हा शेअर 8 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारा लिस्ट झाला होता. मागील काही दिवसांत शेअर बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे या शेअरमध्ये चांगलीच तेजी दिसून येत होती. सोमवारी या शेअरमध्ये 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किट लागला. सोमवारी  Adani Wilmar हा 424.90 रुपयांवर खुला झाला होता. तर, बाजार बंद होताना 461.15  इतकी किंमत झाली. तर, मंगळवारी या शेअरने 504.75 रुपयांचा उच्चांक गाठला. बाजार बंद झाला तेव्हा शेअर 9.13 टक्क्यांनी वधारून 503.10 रुपयांवर बंद झाला. 


रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा


रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामी  खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. युद्धामुळे युक्रेन आणि रशियातून होणाऱ्या सूर्यफुल तेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे.  तेलाच्या वाढलेल्या दराचा फायदा अदानींच्या कंपनीला होणार असल्याची बाजारात चर्चा आहे. 


फेब्रुवारीत लिस्टींग


Adani Wilmar ही कंपनी शेअर बाजारात 8 फेब्रुवारी रोजी लिस्ट झाली होती. शेअर बाजारात लिस्ट होणारी ही अदानी समूहातील सातवी कंपनी आहे. जवळपास 250 रुपयांच्या आसपास ही कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली होती. अदानी विल्मर ही कंपनी अदानी समूह आणि सिंगापूरची विख्यात कंपनी विल्मर ग्रुपमध्ये 50-50 भागिदारी आहे. फॉर्च्युन ब्रॅण्ड अंतर्गत खाद्य तेल आणि इतर खाद्य उत्पादनांची विक्री केली जाते. भारतीय बाजारपेठेत या कंपनीचा मोठा वाटा आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha