PAN Aadhaar Link  : आयकर विभागाच्या (Income Tax) नियमांनुसार 31 मार्च 2022 पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN Aadhaar Link) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे न केल्यास तुमचे पॅन कार्ड अवैध ठरवण्यात येईल. यासोबतच तुम्हाला गुंतवणुक, पीएफवर जास्त टीडीएस यासारख्या अनेक कामांमध्ये अडचणीचा सामना करावा लागेल. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने अनेक जण या कामामध्ये व्यस्त आहेत. मात्र या नियमापासून काही अपवादात्मक व्यक्तींना सूट मिळणार आहे. ही सूट का आणि कोणासाठी लागू आहे जाणून घ्या.


आधार-पॅन लिंक (PAN Aadhaar Link) अनिवार्य
आयकर कायद्याच्या कलम 1961 च्या कलम 139AA नुसार, नागरिकांना त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांची अनेक आर्थिक कामे ठप्प होऊ शकतात. यामध्ये नवीन डेबिट/क्रेडिट कार्डच्या वापरातही अडथळा येऊ शकतो. यामध्ये 50 हजार रुपयांपेक्षा जास्त FD मिळवण्यामधील समस्येचा देखील समावेश आहे. मात्र काही क्षेत्रातील व्यक्तींना या नियमातून सूट देण्यात आली आहे.


'या' लोकांना पॅन-आधार लिंक (PAN Aadhaar Link) करण्यापासून सूट



  • ज्यांच्याकडे आधार कार्ड किंवा त्याचा नावनोंदणीचे ओळखपत्र नाही त्यांना सध्या या नियमातून सूट देण्यात आली आहे.

  • मेघालय, जम्मू आणि काश्मीर आणि आसाम तसेच केंद्रशासित प्रदेशातील रहिवासी

  • ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे त्यांनाही या नियमातून सूट देण्यात आली आहे.

  • भारताचे नागरिकत्व नसलेल्यांना पॅन-आधार लिंक बंधनकारक नाही

  • अनिवासी आयकर कायदा 1961 नुसार सूट मिळालेल्या नागरिकांना पॅन-आधार लिंक करणे आवश्यक नाही.


अशा प्रकारे आधार आणि पॅन लिंक (PAN Aadhaar Link) करा



  • आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी आयकर वेबसाइट https://www.incometaxindia.gov.in/pages/pan.aspx ला भेट द्या.

  • आधार लिंकचा पर्याय निवडा

  • आधार आणि पॅन क्रमांकासाठी विचारलेले तपशील प्रविष्ट करा.

  • नंतर कॅप्चा प्रविष्ट करा.

  • त्यानंतर लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक होईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :