PM Kisan Samman Nidhi Yojana : केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे 6 हजार रुपये 2 हजार रुपयांच्या तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. Direct Benefit Transfer योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana साठी e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख आता 22 मे 2022 करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत https://pmkisan.gov.in वर याची माहिती देण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठी 22 मे 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
>> PM Kisan Yojana मध्ये असे करा केवायसी:
- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्ही सर्वात आधी त्याच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर क्लिक करा.
- येथे तुम्ही या पोर्टलच्या होम पेजवर क्लिक करा.
- येथे तुमच्या समोर एक टॅब उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आधारची माहिती विचारली जाईल.
- येथे आधार क्रमांक टाका.
- त्यानंतर तुम्ही Search बटन दाबा. येथे तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय उघडेल.
- नंबर टाकल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर 4 अंकी OTP येईल.
- त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर पुन्हा 6 अंकी OTP येईल.
- हा OTP नमूद करा.
- त्यानंतर Submit बटण दाबा.
- eKYC योग्यरितीने केल्यानंतर, तुम्हाला एक संदेश मिळेल की e-KYC योग्य प्रकारे केले गेले आहे. दुसरीकडे, केवायसी प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असल्यास, ईकेवायसी आधीच पूर्ण झाली आहे, असा संदेश येईल.
- जर Invalid चा मेसेज येत असेल तर, अशा परिस्थितीत तुमच्या आधारमधील कोणतीही माहिती चुकीची आहे.
- आधी ही माहिती आधार केंद्रात दुरुस्त करा आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा.
- ई-केवायसी केल्यानंतर, 2000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात सहजपणे जमा केला जाईल.