Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधती-आशुतोषसह सगळे प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. अरुंधतीने गाणं गायलेल्या ‘सुखाचे चांदणे’ या म्युझिक अल्बमचा लाँच सोहळा नुकताच पार पडला आहे. यानिमित्ताने आता मालिकेत एका नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सवयीचा गुण या उक्तीप्रमाणे या सोहळ्यालाही संजनाने गालबोट लावले आहे. देशमुखांचं घर सोडून गेल्यावरही अरुंधतीला त्रास देणं संजनाने थांबवलेलं नाही. अरुंधतीला त्रास देण्यासाठी संजना सतत काही ना काही नवे प्लॅन्स बनवत असते. यावेळी देखील तिने असंच काहीसं केलं आहे.

Continues below advertisement


संजना देशमुख सध्या आशुतोषच्या कंपनीत मीडिया आणि मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत आहे. नुकताच मालिकेत ‘सुखाचे चांदणे’ या म्युझिक अल्बमचा लाँच सोहळा पार पडला. या सगळ्या सोहळ्याचे नियोजन संजनाने केले होते. आता इतकं सगळं करत असताना अरुंधतीला त्रास देण्याची आयती संधी चालून आली असताना, ती सोडून देण्याचं काम संजना कशी बरं करेल.


पैसे देऊन पत्रकारांना कामाला लावणार!


अरुंधती आणि आशुतोषची वाढती मैत्री संजनाच्या डोळ्यात सलते आहे. आता अरुंधतीचा अपमान कसा करायचं याची संधी संजना शोधत होती. या सोहळ्याच्या निमित्ताने आयती संधी संजानाकडे चालून आली आहे. या सोहळ्यात संजनाने मुद्दाम पैसे देऊन काही पत्रकारांना बोलवले आहे. या पत्रकारांना ती काही प्रश्न अरुंधतीला विचारायला लावणार आहे. यावेळी पुन्हा एकदा भर सोहळ्यात थेट अरुंधतीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.



आता हा सगळा प्रकार आशुतोषच्या लक्षात येणार असून, तो या पत्रकारांची कसून चौकशी करणार आहे. यावेळी पत्रकार आपल्याला हे प्रश्न विचारण्यासाठी संजनाने पैसे दिल्याची कबुली देणार आहेत, आता अरुंधतीचा अपमान करणाऱ्या संजनाला आशुतोष कंपनीतून थेट बाहेरचाच रस्ता दाखवणार आहे.   


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha