एक्स्प्लोर

Adani Transmission Q3 Results : अदानी ट्रान्समिशनचा नफा 73 टक्क्यांनी वाढला; तिमाही निकाल जाहीर

Adani Transmission Q3 Results: अदानी समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या अदानी ट्रान्समिशनच्या तिमाही नफ्यात वाढ झाली आहे.

Adani Transmission Q3 Results : अदानी ट्रान्समिशन लिमिटेडने (Adani Transmission)आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्‍या तिमाहीचे निकाल (Adani Transmission Q3 Results) जाहीर केले आहेत. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत अदानी ट्रान्समिशनच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी ट्रान्समिशनचा नफा 478.15 कोटी रुपये होता. हा नफा 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत 283.75 कोटी रुपये होता.

तिसऱ्या तिमाहीत अदानी ट्रान्समिशनच्या महसुलात 15.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत महसूल 2623 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA रु. 1798 कोटी असून 28.9 टक्के जास्त आहे. कंपनीने म्हटले आहे की, नवीन ट्रान्समिशन लायन्स कार्यान्वित झाल्यामुळे कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रोख नफ्यात 34 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 955 कोटी रुपये झाला आहे. त्याच वेळी, या कालावधीत ईपीएस प्रति शेअर 4.26 रुपये आहे.

कंपनीने माहिती देताना सांगितले की, तिसर्‍या तिमाहीत, 99.75 टक्के सिस्टम उपलब्धतेसह 371 ckm चे ऑपरेशन सुरू केले आहे. तिसऱ्या तिमाहीत व्यावसायिक विभागातील मागणी वाढल्यामुळे विजेची मागणी 4.4 टक्क्यांनी वाढली आहे. यासोबतच वितरणामुळे होणाऱ्या तोट्यात 5.6 टक्के घट झाली आहे.

अदानी ट्रान्समिशनचे एमडी अनिल सरदाना म्हणाले की, कंपनी सतत नवीन टप्पे गाठत आहे. अदानी ट्रान्समिशन कंपनी आता ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनमध्ये एक प्रमुख कंपनी झाली आहे. आव्हानात्मक आर्थिक वातावरण असूनही कंपनी विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी ट्रान्समिशन आणि वितरण कंपनी म्हणून आमचे अस्तित्व आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

अदानी ट्रान्समिशन ही अदानी समूहाची वीज पारेषण आणि वितरण कंपनी आहे. कंपनीचे कामकाज 13 राज्यांमध्ये आहे आणि तिचे एकूण नेटवर्क 18,795 ckm आहे ज्यापैकी 15,371 ckm कार्यरत आहे. 3424 ckm वरील बांधकाम विविध टप्प्यात सुरू आहे. अदानी ट्रान्समिशन मुंबई आणि मुंद्रा SEZ मध्ये 12 दशलक्ष ग्राहकांना सेवा देत आहे.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे मागील 8-10 दिवसांत अदानी समूहाच्या शेअर दरात मोठी घसरण झाली. अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअर दरातही मोठी घसरण झाली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund Update : सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget