एक्स्प्लोर

अंबानी-अदानी एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार नाहीत! काय आहे रिलायन्स-अदानी समूहाचा 'नो पोचिंग करार'?

No Poaching Agreement :  रिलायन्स आणि अदानी (Adani and Ambani ) या देशातील दोन सर्वात कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Adani and Ambani No Poaching Agreement : रिलायन्स आणि अदानी (Adani and Ambani ) या देशातील दोन सर्वात कंपन्या. या कंपन्यांमध्ये नोकरी करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मात्र या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम अदानी यांच्या अदानी आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स या देशातील मोठ्या व्यावसायिक समूहांनी एक करार केला आहे. या करारांतर्गत त्यांच्या रिलायन्स आणि अदानी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकमेकांसोबत नोकऱ्या मिळणार नाहीत.  'नो पोचिंग करार' असे या कराराचे नाव आहे.

बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, हा करार यावर्षी मे महिन्यात आणण्यात आला असून तो या दोन्ही समूहातील सर्व व्यवसायांना लागू होईल. अदानी आणि अंबानी हे देशातील सर्वात मोठे उद्योजक. देशातच नाही तर जगभरात दोघांचाही ठसा आहे. दोन्ही गटांमधील स्पर्धा स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे अदानी समूहाचा व्यवसाय झपाट्याने वाढत असताना रिलायन्स समूहाचे नाव आधीच मोठे आहे.

दोन्ही कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा

'नो पोचिंग करार' या दोन समूहामधील कराराची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा अदानी समूहाने गेल्या वर्षी पेट्रोकेमिकल्समध्ये प्रवेश केला आहे. रिलायन्सचा पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात आधीपासूनच व्यवसाय आहे, परंतु अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडनेही या क्षेत्रात प्रवेश केला आहे. पेट्रोकेमिकल्सशिवाय 5G स्पेक्ट्रमवरून दोन अब्जाधीश कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. अदानीने हाय-स्पीड डेटा क्षेत्रात 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. तर या व्यवसायात रिलायन्स आधीपासूनच आहे.

करार अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप दोन्ही कंपन्यांच्या सर्व व्यवसायांना लागू

मुकेश अंबानींच्या विविध कंपन्यांमध्ये 3 लाख 80 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत, तर अदानींच्या कंपन्यांमध्ये 23 हजार कर्मचारी काम करत आहेत. मे महिन्यापासून लागू झालेल्या या करारानंतर आता या दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी एकमेकांसोबत काम करू शकणार नाहीत. नो पोचिंग करारानुसार दोन्ही कंपन्या यापुढे एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीत कामावर ठेवू शकणार नाहीत. हा करार अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप या दोन्ही कंपन्यांच्या सर्व व्यवसायांना लागू असेल. म्हणजेच आता रिलायन्स ग्रुपच्या कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अदानी ग्रुपमध्ये नोकऱ्या मिळणार नाहीत आणि अदानी ग्रुपच्या कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलायन्स ग्रुपच्या कोणत्याही कंपनीमध्ये नोकऱ्या मिळणार नाहीत. 

काय आहे 'नो पोचिंग अॅग्रीमेंट' ( What is no poaching agreement)

'नो पोचिंग अॅग्रीमेंट' भारतात नवीन नाही तर आधीपासूनच सुरु आहे. याचे मुख्य कारण असे मानले जाते की स्कील असलेल्या आणि चांगल्या कर्मचाऱ्यांची कमतरता वाढत आहे. यासाठी कंपन्यांना अधिक पगार आणि भत्ते द्यावे लागतात. त्यामुळे टॅलेंटवर केलेल्या गुंतवणुकीचा जास्तीत जास्त वेळ फायदा व्हावा, अशी कंपन्यांची इच्छा आहे.  तज्ज्ञांच्या मते भारतात 'नो पोचिंग करार' बेकायदेशीर नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या

Gautam Adani: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अदानी दुसऱ्या क्रमांकावर, पण...

Reliance : मुकेश अंबांनी यांचे वारसदार ठरले, 18 लाख कोटी रुपयांच्या रिलायन्स उद्योग समूहाचे विभाजन तिघांत होणार 

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget